उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता अत्यंत खळबळजनक माहिती समोर येत आहे. ज्या विमानाने अजितदादांचा बळी घेतला, त्या विमानाचे सारथ्य करण्यासाठी मूळतः कॅप्टन सुमित कपूर यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. मात्र, एका 'ट्रॅफिक जाम'ने आणि नियतीच्या क्रूर खेळाने शेवटच्या क्षणी सूत्रे बदलली आणि महाराष्ट्राने आपला मोठा नेता गमावल्याची माहिती समोर येत आहे. हा दावा केला आहे कपूर यांच्या मित्रांनी.
अजित पवारांचे विमान दुसराच पायलट चालविणार होता. कंपनीने बारामती उड्डाणासाठी दुसऱ्या एका वैमानिकाची निवड केली होती. मात्र, तो वैमानिक विमानतळावर मुंबईत वाहतूक कोंडीत अडकल्याने त्याला उशीर होत होता. अजित पवारांसारख्या वक्तशीर आणि मोठ्या नेत्याला नियोजित प्रचार सभांना पोहोचायचे असल्याने कंपनीने कॅप्टन कपूर यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. १५,००० तासांहून अधिक उड्डाणाचा दांडगा अनुभव असणारे कपूर हे या क्षेत्रातील दिग्गज मानले जात होते. मात्र, त्या दिवशीची ३ किमीची कमी व्हिजिबिलिटी आणि तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा अनुभवही अपुरा ठरला.क
कपूर यांचे मित्र जी. एस. ग्रोवर यांनी आठवण सांगितली की, हाँगकाँगहून परतल्यानंतर कपूर यांनी त्यांच्याशी दीर्घकाळ संवाद साधला होता. "आपल्या आरोग्याची विशेष काळजी घे," असा मोलाचा सल्ला त्यांनी ग्रोवर यांना दिला होता. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
दुसरे मित्र नरेश तनेजा म्हणाले की, "कपूर यांचा अपघात झाला ही बातमी ऐकल्यावर सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसला नाही. ते अत्यंत अनुभवी आणि शिस्तप्रिय वैमानिक होते. त्यांच्यासारख्या व्यक्तीसोबत असे घडू शकते, हे पचवणे कठीण आहे." त्यांना खूप अनुभव होता, यामुळे ही चूक होणे अशक्य आहे. याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कपूर यांच्या मित्रांनी केली आहे.
Web Summary : A last-minute pilot change occurred on Ajit Pawar's flight due to traffic. Captain Sumit Kapoor, with vast experience, replaced another pilot stuck in traffic. Friends call for investigation due to low visibility and technical issues.
Web Summary : अजित पवार के विमान में यातायात के कारण अंतिम समय में पायलट बदला गया। अनुभवी कैप्टन सुमित कपूर ने ट्रैफिक में फंसे पायलट की जगह ली। दोस्तों ने कम दृश्यता और तकनीकी समस्याओं के कारण जांच की मांग की।