Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:29 IST2025-07-04T15:28:47+5:302025-07-04T15:29:28+5:30
Eknath Shinde Jai Gujarat Slogan Video: गुजराती समाजाकडून पुण्यातील कोंढवा भागात हे सेंटर उभारण्यात आले आहे. शिंदे यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत हा नारा दिला आहे.

Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
Eknath Shinde Pune Speech: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आधीच मराठी आणि हिंदीवरून वाद सुरु असताना आता शिंदे यांच्या जय गुजरातची चर्चा सुरु होणार आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जयराज स्पोर्ट्स् आणि कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण केले. यावेळी भाषण संपतानाच शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र म्हटले आणि निघत होते. तेव्हा खाली वाचून त्यांनी पुन्हा जय गुजरात असा नारा दिला. यावरून आता वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
गुजराती समाजाकडून पुण्यातील कोंढवा भागात हे सेंटर उभारण्यात आले आहे. शिंदे यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत हा नारा दिला आहे. अमित शाह यांच्यासाठी शिंदे यांनी एक शेर ऐकविला. ''आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है, आपके आने से यहाँ की हवा का रुख बदल जाता है, आपके आनेसे हर शख्स आदब से झुक जाता है'', असा हा शेर शिंदे यांनी ऐकवला. याचेही राजकीय संदर्भ जोडले जात आहेत.
एकनाथ शिंदेंचे पुण्यातून 'जय गुजरात', अमित शहांवर शेर ऐकवला आणि नंतर... #EknathShinde#JaiGujarat#Maharashtra#Pune#AmitShahpic.twitter.com/jR5lwouE3a
— Lokmat (@lokmat) July 4, 2025