मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 00:22 IST2025-07-20T00:20:27+5:302025-07-20T00:22:08+5:30

CM Devendra Fadnavis Aditya Thackeray in Mumbai Hotel: आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत एकाच वेळी एकाच ठिकाणी... निव्वळ योगायोग की आणखी काही...?

Big development Aditya Thackeray and CM Devendra Fadnavis in the same hotel in mumbai at the same time political discussions maharashtra politics | मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

CM Devendra Fadnavis Aditya Thackeray in Mumbai Hotel: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात वेगाने समीकरणे बदलताना दिसत आहेत. नुकतेच पावसाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काही विषयांवरून चर्चा रंगली. इतकेच नव्हे तर, फडणवीसांनी भर सभागृहात उद्धव ठाकरेंना महायुतीसोबत येण्याची ऑफरही दिली. या साऱ्या गोष्टींच्या चर्चा थंडावल्याही नव्हत्या. तशातच, महाराष्ट्राच्या राजकारणातून आणखी एक महत्वाची बातमी समोर आली. शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये एकाच वेळी एकत्र असल्याची माहिती विविध प्रसारमाध्यमांनी दिली. त्यामुळे या दोन नेत्यांच्यात बंद दाराआड राजकीय चर्चा झाली असेल का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये एकाच वेळी एकत्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटूंब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गाठीभेटी गाठी वाढल्या आहेत, हे नव्याने सांगायची गरज नाही. त्यामुळेच आता हे दोन्ही नेते एकत्र असल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आले होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. तसेच या दोघांमध्ये भेट झाली की नाही, यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिली होती ऑफर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली होती. ‘उद्धवजी २०२९ पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा काहीही स्कोप नाही, पण तुम्हाला इथे सत्ते यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर बऱ्याच चर्चाही रंगल्या होत्या.

उद्धव ठाकरेंचे उत्तर काय होते?

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या ऑफर बोलताना उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांना म्हणाले होते की, ‘सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात आणि त्या गोष्टी खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात.’

उद्धव ठाकरे-फडणवीसांची झाली होती भेट

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती. या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी, ‘कुणी कुणाला भेटलं म्हणजे युतीसाठी भेटलं असं होतं नाही,’ असे स्पष्टीकरण दिले होते.

Web Title: Big development Aditya Thackeray and CM Devendra Fadnavis in the same hotel in mumbai at the same time political discussions maharashtra politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.