एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! राज्यातील बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:54 IST2025-12-31T18:53:19+5:302025-12-31T18:54:15+5:30

प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाने घेतला पुढाकार

Big decision of ST Corporation Special campaign every 15 days to clean bus stands in the state | एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! राज्यातील बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! राज्यातील बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम

Maharashtra ST Bus Services: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काच, शौचालये, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, कार्यालयीन कक्ष आदींची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. साचलेला कचरा, अनावश्यक झाडे-झुडपे, जाहिरातींचे फलक, जाळी-जमट यांचे निर्मूलन करून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व नीटनेटका केला जाणार आहे.

कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण व विल्हेवाट लावली जाणार असून प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्वच्छता व नियमित देखभाल ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या अभियानासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर या मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. दर १५ दिवसांनी होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार असून प्रवासी सेवेमध्ये गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title : महाराष्ट्र एसटी निगम का बड़ा फैसला: हर 15 दिन में बस स्टेशन सफाई अभियान

Web Summary : महाराष्ट्र राज्य परिवहन निगम (एसटी) ने सभी बस स्टेशनों पर हर 15 दिन में सफाई अभियान चलाने का फैसला किया है। इसका उद्देश्य यात्रियों को स्वच्छ, सुरक्षित और स्वस्थ सुविधाएं प्रदान करना और एसटी की छवि को मजबूत करना है। कचरा प्रबंधन और पेयजल स्थलों की स्वच्छता पर ध्यान दिया जाएगा। स्थानीय भागीदारी को प्रोत्साहित किया गया है।

Web Title : Maharashtra ST Corporation Launches Bi-Weekly Bus Station Cleanliness Drive

Web Summary : Maharashtra State Transport (ST) Corporation mandates bi-weekly cleanliness drives at all bus stations. The initiative aims to provide passengers with cleaner, safer, and healthier facilities, enhancing the ST's public image. The focus includes deep cleaning, waste management, and ensuring hygiene at drinking water points. Local participation is encouraged for effective implementation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.