Coronavirus: शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय, राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 01:57 PM2020-03-20T13:57:38+5:302020-03-20T14:19:45+5:30

Coronavirus: पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

Big decision of Education Ministers, exams from 1st to 8th in the state canceled! rkp | Coronavirus: शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय, राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द!

Coronavirus: शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय, राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द!

googlenewsNext
ठळक मुद्दे'पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द'दहावी वगळता इतर सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली. 

वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, " पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नववी आणि अकरावीच्या परिक्षेचा निर्णय 15 एप्रिलनंतर होईल आणि दहावीचे उर्वरित पेपर वेळापत्रकानुसार होणार आहे. याशिवाय, दहावी वगळता इतर सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत."

तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी 'कोरोनाच्याविरोधात जागतिक युद्ध सुरू असून संपूर्ण जगाला घरात थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे 15 दिवस काळजी घेण्याची गरज आहे' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील 25 टक्क्यांवर आणली आहे. यापूर्वी ती 50 टक्क्यांवर आणली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

'रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहिन्या आहेत. त्या बंद करणे सोपं आहे, पण त्या बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवर परिणाम होईल. महापालिका कर्मचारी, डॉक्टर यांची ने-आण कशी होईल. तूर्त या दोन सेवा बंद न करता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील 25 टक्क्यांवर आणली आहे. यापूर्वी ती 50 टक्क्यांवर आणली होती. मुंबई महानगर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. जीवनाश्यक वस्तू व्यक्तिरिक्त सर्व गोष्टी बंद. ही बंदी 31 मार्चपर्यंत असेल' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

'संकट येतं आणि जातं. पण, माणुसकी सोडू नका. हे संकट जाईल. त्यामुळे ज्याचं पोट हातावर आहे, त्याचं किमान वेतन कापू नका' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्वच क्षेत्रातील उद्योजकांना आणि उद्योगांना आवाहन केलं आहे. तसेच सरकारने केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. कारण सध्या तरी संपर्क आणि संसर्ग टाळण्याशिवाय काहीही पर्याय नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, चीनमधील व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली आहे. तसेच, पाच जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची दिलासादायक माहितीही त्यांनी दिली आहे. 

Web Title: Big decision of Education Ministers, exams from 1st to 8th in the state canceled! rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.