शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:02 IST

Eknath Shinde CM News: आपल्या नेतृत्वात एवढे घवघवीत यश देऊनही आपल्याला मुख्यमंत्री पद मिळत नसल्याने एकनाथ शिंदे नाराज होते, असे गेल्या चार दिवसांपासून चर्चिले जात होते. यावर शिंदेंनीच ठाण्यात पत्रकार परिषद देत भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे मोदींना कळविल्याचे सांगितले होते.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला आपल्या नेतृत्वात एवढे घवघवीत यश देऊनही आपल्याला मुख्यमंत्री पद मिळत नसल्याने एकनाथ शिंदे नाराज होते, असे गेल्या चार दिवसांपासून चर्चिले जात होते. यावर शिंदेंनीच ठाण्यात पत्रकार परिषद देत भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे मोदींना कळविल्याचे सांगितले होते. यामुळे शिंदे उपमुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरु झाली होती. परंतू, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. 

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नसल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नसले तरी ते नव्या मंत्रिमंडळात असतील असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. 

मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर येणे योग्य नाही. यामुळे शिवसेना दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री करेल. यामुळे शिंदे सोडून अन्य नेत्याला त्या पदाची संधी दिली जाईल, असेही शिरसाट म्हणाले. 

यामुळे शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री पदाचा नेता कोण अशीही चर्चा सुरु झाली आहे. यात श्रीकांत शिंदेंचेही नाव पुढे येत आहे. असे झाले तर श्रीकांत शिंदे यांना खासदारकी सोडून द्यावी लागणार आहे. तसेच कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.  

मंत्रिमंडळाचे काय?

भाजप नवीन मंत्रिमंडळात अर्धी पदे आपल्या पक्षाकडे ठेवू शकते. तर नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला तीन मोठ्या खात्यांसह महाराष्ट्रातील १२ कॅबिनेट पदे मिळू शकतात,अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिमंडळात नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाते, जलसंपदा ही प्रमुख खाती मिळू शकतात, असं बोलले जात आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024