Unlock4: खूशखबर! उद्यापासून करू शकणार राज्यांतर्गत रेल्वे प्रवास; बुकिंग सुरू करण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 06:13 PM2020-09-01T18:13:18+5:302020-09-01T18:49:33+5:30

Unlock4: केंद्र सरकारने ईपासची अट काढून टाकल्यानंतर सोमवारी राज्य सरकारनेही ई पास रद्द केला आहे. यामुळे खासगी वाहने, प्रवाशांना आता ई पास शिवाय राज्यात म्हणजेच आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे मध्य रेल्वेनेही याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

Big Breaking: Central Railway booking Start from 2 September to travel in Maharashtra only | Unlock4: खूशखबर! उद्यापासून करू शकणार राज्यांतर्गत रेल्वे प्रवास; बुकिंग सुरू करण्यास परवानगी

Unlock4: खूशखबर! उद्यापासून करू शकणार राज्यांतर्गत रेल्वे प्रवास; बुकिंग सुरू करण्यास परवानगी

Next

मुंबई : राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची अट रद्द केल्याने आता रेल्वे खात्यानेही मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठी मध्य रेल्वेने उद्या, 2 सप्टेंबरपासून बुकिंगला सुरुवात केली आहे. हा रेल्वे प्रवास लॉकडाऊनपासून बंद करण्यात आला होता. यानंतर विशेष रेल्वेसेवा सुरु ठेवण्यात आली होती. 


केंद्र सरकारने ईपासची अट काढून टाकल्यानंतर सोमवारी राज्य सरकारनेही ई पास रद्द केला आहे. यामुळे खासगी वाहने, प्रवाशांना आता ई पास शिवाय राज्यात म्हणजेच आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे मध्य रेल्वेनेही याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. 
मध्ये रेल्वेने पत्रक काढत आरक्षण पद्धतीने उद्यापासून रेल्वेसेवा सुरु केली जाणार (Central Railway booking Start) असल्याचे म्हटले आहे. सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वेमधून हा प्रवास करता येणार आहे. प्रवासी ही रेल्वे तिकिटे रेल्वे स्थानकांवरून आरक्षित करू शकणार आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे.


म्हणजे नेमके काय?
मध्ये रेल्वेने लॉकडाऊन काळात देशभरात जाण्यासाठी 16 अप आणि 16 डाऊन रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या. मात्र, महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवासबंदी असल्याने महाराष्ट्रातील या रेल्वे गाड्यांचा स्थानकांवरील थांबा (हॉल्ट) रद्द केला होता. आता ती पुन्हा सुरु केली जाणार आहेत. परराज्यात जाण्याऱ्या या रेल्वे गाड्यांमधून राज्यांतर्गत रेल्वेस्थानकांवर प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी 'लोकमत डॉट कॉम'ला माहिती दिली.


राज्यसरकारने सोमवारी लॉकडाऊन सुरु करताना आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी दिली आहे. राज्यात लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारने ई-पास (No E-pass required) रद्द केला आहे. आता राज्यात ई-पासशिवाय प्रवास करता येणार आहे.त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत.



 

काय बंद राहणार?

  • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था आणि क्लासेस बंदच राहणार आहेत. ऑनलाीन, डिस्टन्स लर्निंग सुरु राहणार आहे. 
  • सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम आदी स्थळे बंदच राहणार आहेत. 
  • एमएचएने परवानगी दिल्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंदी. 
  • मेट्रो सेवा बंदच राहणार आहे. 
  • सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम बंद राहणार आहेत. 

 

काय सुरु राहणार... 

  • सामान्य दुकाने, दारुची दुकाने सुरु राहणार आहेत. 
  • हॉटेल, लॉज 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
  • सरकारी कार्यालये त्यांना दिलेल्या क्षमतेनुसार सुरु ठेवायची आहेत..
  • खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी आहे, 
  • आंतरजिल्हा प्रवासासाठी आता परवानगी देण्यात आली असून कोणत्याही ई पासची गरज लागणार नाही. 
  • खासगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. 
  • टॅक्सी - 1+3 प्रवासी, रिक्षा - 1+2 प्रवासी, चारचाकी- 1+3 प्रवासी, दुचाकी- 1+1 हेल्मेट आणि मास्क परवानगी

 

मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार 

BSNL ची धांसू ऑफर; प्रीपेड रिचार्जवर 600 रुपयांपर्यतचा अतिरिक्त टॉकटाईम

Web Title: Big Breaking: Central Railway booking Start from 2 September to travel in Maharashtra only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.