BSNL ची धांसू ऑफर; प्रीपेड रिचार्जवर 600 रुपयांपर्यतचा अतिरिक्त टॉकटाईम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:16 PM2020-09-01T16:16:03+5:302020-09-01T16:21:13+5:30

बीएसएनएलने अद्याप देशभरात ४ जी नेटवर्क सुरु केलेले नाहीय. जिओ ५ जी लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशावेळी बीएसएनेलसमोर ग्राहक टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी कंपनी BSNL वेगवेगळे नवनवीन प्लॅन सादर करत आहे.

बीएसएनएलने अद्याप देशभरात ४ जी नेटवर्क सुरु केलेले नाहीय. जिओ ५ जी लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशावेळी बीएसएनेलसमोर ग्राहक टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

हीच ४ जी नेटवर्कची कमतरता भरून काढण्यासाठी बीएसएनएल ग्राहकांना मोठमोठ्या ऑफर असलेले प्लॅन देत आहे. यानुसास बीएसएनएल प्रीपेड प्लॅन्सवर 20 टक्के किंवा 600 रुपयांचा एक्स्ट्रा टॉकटाईम देत आहे.

बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी 600 रुपयांपर्यंतचा टॉकटाईम देत आहे. या एक्स्ट्रा टॉकटाईमच्या प्लॅनची सुरुवात 220 रुपयांपासून होत आहे.

कंपनी 220 रुपयांच्या रिचार्जवर 240 रुपयांचा टॉकटाईम देत आहे. तर 550 रुपयांच्या रिचार्जवर 575 रुपयांचा टॉकटाईम देत आहे.

बीएसएनएल महागडे आणि मोठ्या व्हॅलिडिटीच्या प्लॅनवरही अतिरिक्त टॉकटाईम देत आहे. यामध्ये 1100 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 1200 रुपयांचा टॉक टाईम ऑफर केला जात आहे. याशिवाय बीएसएनएलचे दोन महागडे प्लॅन 2000 आणि 3000 रुपयांवरही एक्ट्रा टॉकटाईम दिला जात आहे.

2000 रुपयांच्या प्लॅनवर ग्राहकाला 2300 रुपयांचा टॉकटाईम दिला जात आहे. तर 3000 रुपयांच्या रिचार्जवर 20 टक्के एक्स्ट्रा म्हणजेच 3600 रुपये टॉकटाईम दिला जात आहे.

या ऑफरपासून बीएसएनएलने काही स्वस्त प्लॅन लांब ठेवले आहेत. हे पॉप्युलर प्लॅनही आहेत. यात 100, 110 आणि 150 रुपयांचे प्लॅन येतात. यावर मात्र बीएसएनएलने कोणतीही ऑफर दिलेली नाही.

या प्रसिद्ध प्लॅनवर फुल टॉकटाईम दिला जात आहे. बीएसएनएलची ही ऑफर 6 ऑक्टोबरपर्यंतच आहे.

महत्वाचे म्हणजे या ऑफरचा लाभ ग्राहकांना केवळ रविवारी रिचार्ज केल्य़ावरच होणार आहे.