शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 22:24 IST

Bjp Support MNS Candidate: भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच अपक्ष उमेदवार जरी भाजपाचे समर्थन असल्याचे सांगत असला तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. 

माहीम मतदारसंघात भाजपा अमित ठाकरेंचा प्रचार करणार का, समर्थन देणार का याबाबत भाजपच्याच नेत्यांमध्ये संभ्रम असताना आशिष शेलार यांनी शिवडीतमनसेचे नेते उमेदवार बाळा नांदगावकर यांना समर्थन जाहीर केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच अपक्ष उमेदवार जरी भाजपाचे समर्थन असल्याचे सांगत असला तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. 

मनसेला दिलेले समर्थन हे फक्त शिवडीपुरतेच असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले. शिवडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. ज्या अपक्षाने भाजपाचा उल्लेख केला त्याला आमचे समर्थन नाही. कारण कुठलाही संवाद, चर्चा न करता, थेट अर्ज भरण्यात आला. यामुळे दोघेच रिंगणात राहतात. मविआचे अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर. लोकांची कामे होण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. भाजपा विचारधारेवर चालणारा आहे, यामुळे ही विचारधारा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे, असे शेलार म्हणाले. 

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा दगाबाज म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले जाईल. शिवडी हा वारकऱ्यांचा विभाग आहे. उद्धव ठाकरे आषाढीला पंढरपूरला गेले खरे परंतू त्यांनी पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करणार नाही ही भूमिका घेतली होती. कोरोनाकाळात जेव्हा लोक देवाचा धावा करीत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मंदिरे बंद केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यावेळी वारी रोखली, अशी टीका शेलार यांनी केली.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shivadi-acशिवडीBJPभाजपा