शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

१०५ वर्षापासून रखडलेल्या पंढरपूर-लोणंद रेल्वे लोहमार्गाचे रविवारी भूमिपूजन

By admin | Updated: June 9, 2017 19:56 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरअकलूज : पंढरपूर-लोणंद या महत्वकांक्षी लोहमार्गाचे भूमिपूजन रविवार दि. ११ जून रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. खा. मोहिते-पाटील यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केल्याचे हे यश आहे. ब्रिटिश काळात सन १९१२ साली हा लोहमार्ग मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी हा लोहमार्ग तब्बल १०५ वर्षे रखडला आहे. माजी राज्यसभा सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी हा मुद्दा चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी गत तीन वर्षांपासून यासाठी सतत पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी खा. मोहिते-पाटील यांचे निकटचे संबंध या प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या कामी आले आहेत.सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभास खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना बोलावून या रेल्वेमार्गाविषयी विनंती केली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी सादर झालेल्या अर्थसंकल्पात ११४९ कोटी मंजूर करून चालू अर्थीक वषार्साठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली. रविवार दि.११ रोजी या रेल्वेमार्गाच्या कामांचे भूमिपूजन कराड येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भूमिपूजन होणार आहे. ----------------------१०९ कि.मी.साठी तब्बल १०५ वर्षांची प्रतिक्षाहा रेल्वेमार्ग एकूण १४५ किमीचा असून त्यातील फलटणपर्यंतचे ३४ किमीचे काम झाले आहे. उर्वरित १०९ किमीच्या कामांसाठी तब्बल १०५ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. आता त्याचे भूमिपूजन होणार असल्याने हा लोहमार्ग पूर्ण होण्याचे निश्चित आहे. यासाठी ३२७ हेक्टर जमिनीचे संपादनही केव्हाच झाले आहे. ----------------दुग्ध-शर्करा योग१२ जूनला खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा वाढदिवस आहे. त्याच्या एक दिवस आगोदर ते पाठपुरावा करत असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आहे. असा दुग्ध-शर्करा योग योगायोगाने जुळून आलेला आहे.