तेलमाफियांना पाठिशी घालण्यासाठी भुजबळांनी टाकला दबाव - माजी पोलीस अधिका-याचा आरोप

By Admin | Updated: June 17, 2015 13:28 IST2015-06-17T13:15:59+5:302015-06-17T13:28:51+5:30

छगन भुजबळ यांनी तेलमाफियांना पाठिशी घालण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव टाकला होता असा थेट आरोप माजी पोलीस अधिकारी संजीव कोकीळ यांनी केला आहे

Bhujbal's pressure to inspire oilmafia - the charge of former police officer - is alleged | तेलमाफियांना पाठिशी घालण्यासाठी भुजबळांनी टाकला दबाव - माजी पोलीस अधिका-याचा आरोप

तेलमाफियांना पाठिशी घालण्यासाठी भुजबळांनी टाकला दबाव - माजी पोलीस अधिका-याचा आरोप

>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १७ - माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तेलमाफियांना पाठिशी घालण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव टाकला होता असा थेट आरोप माजी पोलीस अधिकारी संजीव कोकीळ यांनी केला आहे. त्यांच्याविरोधात तत्कालिन पोलीस आयुक्त अरूण पटनायक व संजीव दयाळ या दोघांकडेही लेखी तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही कोकीळ यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोकीळ यांनी आपल्या वैयक्तिक सचिवाच्या माध्यमातून छगन भुजबळ व समीर भुजबळ सतत दबाव टाकत होते आणि तेलमाफियांच्या विरोधात कारवाई करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मी प्रत्येकवेळी त्यांच्या दबावाला बळी न  पडता कारवाईचा धडाका चालू ठेवला व बदली झाल्यानंतरही काम चोख केले असे कोकीळ यांनी सांगितले. समीर भुजबळ यांनीही एमआयटी येथील कार्यालयात बोलावून आपल्याला तेलमाफियांवर कारवाई करू नका असे सांगितल्याचे कोकीळ यांनी म्हटले आहे. आमच्यासाठी पोलीस आयुक्त हेच सर्वोच्च अधिकारी असतात, त्यामुळे अशा दबावाची कल्पना मी त्या त्या वेळी आयुक्तांना दिली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही असेही कोकीळ म्हणाले. बेहिशेबी मालमत्ता व महाराष्ट्र सदन बांधकामप्रकरणात घोटाळ्याचा आरोप असलेल्या छगन भुजबळांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खाते व सक्तवसुली संचालनालयाने कारवाईचा बडगा उगारला असल्याने कोकीळ यांच्या आरोपांनी भुजबळांची आणखी अडचण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Bhujbal's pressure to inspire oilmafia - the charge of former police officer - is alleged