शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

भुजबळांची आणखी 20 कोटींची मालमत्ता जप्त, मुंबई, पुणे, नाशिकात छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 9:58 PM

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लाँड्रिंग प्रकरणी गेल्या दीड वर्षापासून कारागृहात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लाँड्रिंग प्रकरणी गेल्या दीड वर्षापासून कारागृहात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भुजबळ कुटुंबीयांची मंगळवारी २०.४१ कोटीची मालमत्ता जप्त केली. मुंबई, पुणे व नाशिक या ठिकाणच्या पाच आलिशान बंगले, फ्लॅट, कार्यालये व भूखंडाचा त्यामध्ये समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.छगन भुजबळ यांची येत्या काही दिवसांमध्ये जामिनावर सुटका होण्याची शक्यता वर्तविली जात असताना ईडीने केलेल्या कारवाईमुळे पुन्हा धक्का बसला आहे. आतापर्यंत त्यांच्यासह त्यांचे पुत्र आमदार पंकज व पुतणे समीर भुजबळ यांच्या मालकीची 178 कोटी किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. मंगळवारी मुंबई, पुणे व नाशिक येथील बंगला, फ्लॅट, कार्यालय व भूखंड जप्त केले.काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन भवनाच्या बांधकामात मोठा अपहार केला. त्याचप्रमाणे बनावट कंपन्याची स्थापना करून शेकडो कोट्यवधीचा बेनामी मालमत्ता वर्ग केल्याचे ईडी गुन्हा दाखल केला असून, भुजबळ कुटुंबीयासह एकूण 52 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. भुजबळ यांना गेल्या वर्षी 14 मार्चला अटक करण्यात आली असून, सध्या न्यायालयीन कोठडीत आॅर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

 

 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस