शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ फाउंडेशनचे खाते चौकशीच्या घेऱ्यात

By admin | Updated: June 11, 2015 02:59 IST

छगन भुजबळ सामाजिक कल्याण संस्थेचे खाते सारस्वत बँकेत असून, या खात्यावरील व्यवहाराची चौकशी आता भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून ( एसीबी) केली जाणार आहे

डिप्पी वांकाणी, मुंबईछगन भुजबळ सामाजिक कल्याण संस्थेचे खाते सारस्वत बँकेत असून, या खात्यावरील व्यवहाराची चौकशी आता भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून ( एसीबी) केली जाणार आहे. एसीबीने छगन भुजबळ व इतर पाच जणांच्या विरोधात कलिना लायब्ररी प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. सारस्वत बँकेच्या खात्याचे फेब्रुवारी २०१० ते आॅक्टोबर २०११ या कालावधीतील स्टेटमेंट सरकारी कंत्राटे आणि ती मिळविणाऱ्या कंत्राटदारांनी भुजबळांच्या संस्थेला दिलेल्या भरघोस देणग्या याबाबत सूचक आहे. या खात्यातील व्यवहाराच्या  स्टेटमेंटची प्रतच ‘लोकमत’च्या हाती आली आहे.छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी विविध बांधकाम कंपन्यांना दिलेली कंत्राटे व त्यापोटी मिळालेली लाच संस्थेच्या खात्यात जमा केलेला लेखाजोखा या स्टेटमेंटवरून स्पष्ट होत आहे. २०१०-११ च्या दरम्यान छगन भुजबळ यांनी नाशिक महोत्सवाचे आयोजन केले व त्यात सहभागी झालेली इव्हेंट कंपनी व बॉलीवूड कलाकारांना याच खात्यातून पैसे देण्यात आले.त्या संदर्भात बॉलीवूड कलाकार लारा दत्ता, सोनू निगम, नेहा धुपिया यांचीही नावे या खात्यावर दिसत आहेत. शिवाय सेलिना जेटली ४.५ लाख, साधना ३.६ लाख, दिनो मोरिया ४.५ लाख, लारा दत्ता १६.२० लाख असेही या खात्यातून वाटप झाले आहे. इतर कलाकारांत अभिजित सावंत (गायक) याला ४५ हजार, नेहा धुपिया ४.९ लाख, सोनू निगम लाख रुपये देण्यात आले. सारस्वत बँकेतील या खात्याचा क्रमांक सीएपीयूबी १६५५ असून, हे खाते नाशिक येथील आहे. २ फेब्रुवारी २०१० रोजी हे खाते फक्त ५ हजार रुपये भरून सुरू करण्यात आले. पण फक्त १० दिवसांत या खात्यावर अशोका बिल्डकॉमकडून २५ लाख रुपये जमा झाले. अशोका बिल्डकॉम व एल अँड टी यांना मुंबई - नाशिक टोल रोड बांधण्याचे कंत्राट देण्यात आले होते. एल अँड टीने भुजबळ यांच्या संस्थेला १० लाख वेगळे दिले. इंडिया बुल्स रियल्टीला कलिना विद्यापीठात वाचनालय बांधण्याचे काम देण्यात आले. त्यांनी ९८ लाख व १ कोटी ४७ लाख रुपये दिले. विविध कंत्राटे मिळालेल्या इतर कंपन्यांत पेनिन्सुला लँड लि.ने २४.७५ लाख दिले. तर पवार पाटकर कन्स्ट्रक्शन्सने दोन टप्प्यांत १० व ५ लाख दिले. या कालावधीत स्वत: काढलेली रक्कम ७०.५ लाख रुपयांची आहे. हे खाते २ फेब्रुवारी २०१० रोजी ५ हजार रुपये भरून सुरू झाले. त्यावरील सर्वाधिक रक्कम २४ फेब्रुवारी रोजी २ कोटी ५२ लाख ७९ हजार ९१६ रुपये होती. २४ आॅक्टोबर २०११ रोजी हे खाते बंद करण्यात आले, त्या वेळी त्यात फक्त २.१२ लाख रुपये होते.