शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भिशीलाही बसला लॉकडाऊनचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 04:41 IST

चिंता : दोन महिन्यांपासून कारभार ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका भिशी या प्रकारालाही बसला आहे. एका खासगी कंपनीकडून राज्याच्या विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या भिशी या गेल्या दोन महिन्यांपासून थंडावल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

श्रीराम चिट्स या नोंदणीकृत कंपनीतर्फे व्यापाऱ्यांचे विविध गट तयार करून त्यांच्यासाठी भिशी चालविली जाते. १ ते १५ लाख रुपयांपर्यंतच्या या भिशी असून, त्यासाठी व्यापाऱ्यांचे विविध गट तयार करून त्यांची जीएसटी विभागाकडे नोंदणी केली जाते. ही कंपनी १९७४ पासून काम करीत असून सध्या महाराष्टÑासह चार राज्यांमध्ये कंपनीचे काम सुरू आहे.

औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या शहरांसह राज्याच्या विविध शहरांमध्ये कंपनीची कार्यालये असून, तेथे भिशी चालविली जाते. पहिल्या महिन्याची रक्कम कंपनी स्वत:कडे ठेवून घेत असते. याशिवाय भिशी लागल्यावर प्रत्येकाकडून ५ टक्के रक्कम घेतली जाते. दर महिन्याच्या तिसºया शनिवारी लिलाव पद्धतीने भिशी काढली जाते. राज्यात मार्च महिन्यापर्यंत या कंपनीच्या भिशी व्यवस्थित सुरू होत्या. मात्र एप्रिलपासून या भिशी बंद पडल्या असून, त्याचे कारण लॉकडाउन असल्याचे सांगितले जाते. लॉकडाउनच्या काळात गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी या भिशी काढण्याला परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात येते.

लॉकडाउनच्या काळामध्ये जवळपास सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून, व्यापाºयांना पैशांची चणचण भासत आहे. त्यातच या भिशी योजनांमध्ये पैसा अडकलेला असताना दोन महिने भिशी काढली जात नसल्याने व्यापारी वर्ग चिंतेमध्ये पडला आहे. कंपनीच्या कार्यालयांमध्ये फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तेथे फोन उचलले जात नाहीत. कंपनीची हेल्पलाइनही तांत्रिक कारणामुळे बंद असल्याचा संदेश तेथे फोन केल्यावर मिळत आहे. कंपनीची काही कार्यालये बंद असल्याने याबाबत चौकशी कोठे करायची या संभ्रमामध्ये भिशीचे सदस्य पडले आहेत. या भिशींची जीएसटी विभागाकडे नोंदणी असली तरी गेले दोन महिने कोणतेही व्यवहारच झाले नसतील तर त्याबाबत या विभागाकडे काही कर भरण्याचा प्रश्नच येत नसल्याचे एका कर सल्लागाराने सांगितले. कंपनीकडे असलेला पैसा सुरक्षित आहे, मात्र लॉकडाउनच्या काळामध्ये भिशी काढण्यासाठी न मिळालेली परवानगी आणि कर्मचाºयांची कार्यालयातील कमी असलेली उपस्थिती यामुळे सध्या भिशी थांबलेली आहे. लवकरच ही भिशी पुन्हा पूर्ववत होईल, असे कंपनीमधील अधिकारी सांगत आहेत. अनेक ठिकाणी या कंपनीची कार्यालये रहिवासी क्षेत्रात असल्याने तेथील रहिवाशांकडून कार्यालय सुरू करण्यास विरोध होत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.औरंगाबाद : १५ वर्षांपासून कार्यरत. भिशीचे ४० ग्रुप आहेत.च्सोलापूर : १५ वर्षांपासून कार्यरत. भिशीचे २५ ग्रुप आहेत.च्सांगली : भिशीचे १६ ग्रुप आहेत. भिशीच्या प्रमाणात मालमत्ता, तारण ठेवलेली आहे.च्कोल्हापूर : १५ वर्षांपासून कार्यरत. भिशीचे ११ ग्रुप असून ५५० सभासद आहेत.कंपनीतर्फे जानेवारी ते मार्च महिन्यातील भिशीचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. लॉकडाऊन असल्याने सध्या लिलाव झालेले नाहीत. वसुलीचे काम सध्या सुरू आहे. मुंबई येथील कार्यालयाच्या सूचनेनंतर भिशीच्या व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.- विश्वनाथ मगदुम, शाखाधिकारी, श्रीराम चिट्स, कोल्हापूर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस