शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

Bhendwal Bhavishyavani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 09:01 IST

Bhendwal Ghatmandni Prediction 2025: पीक परिस्थिती सर्वसाधारण, भरपूर पाऊस, भेंडवळ घट मांडणीची भाकीत

जयदेव वानखडे

जळगाव जामोद (बुलढाणा) :  महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळ घटमांडणीचे भाकीत आज एक मे रोजी पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराजांनी जाहीर केले. यावेळी घटातील शत्रूचे प्रतीक असलेला मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. परंतु करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था..करडी हे धान्य साबूत असल्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे शत्रू आपल्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही. परंतु देशावर संकट असल्याने राजाला प्रचंड ताण राहील देशाच्या तिजोरीत खळखळाट असेल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. 

त्याशिवाय यावर्षी भरपूर पावसाळा असून जून सर्वसाधारण, जुलैमध्ये भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये साधारण पाऊस तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस बरसणार आहे. अवकाळी पावसाचे सुद्धा थैमान राहील त्याचबरोबर पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहील. आणि करव्या वरील पुरी गायब असल्याने पृथ्वीवर प्रचंड संकट येतील त्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तींचा सहभाग असू शकतो. पिकांच्या उत्पन्नाची अनिश्चितता असून भावातही तेजी मंदिर राहील कुठे कमी तर कुठे जास्त पीक येईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी सुद्धा होईल आणि पिकांवर रोगराई पसरेल असाही अंदाज भेंडवळच्या घटमांडणीत वर्तवला आहे. 

दरम्यान, घटामध्ये मांडलेल्या १८ धान्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झालेले आढळून आले त्यावरून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली. भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विदर्भातील अनेक शेतकरी रात्रीपासूनच मुक्कामी होते.

भेंडवडची मांडणी

कापूस पिक -सर्व साधारणज्वारी पिक:- साधारण भावात चांगलेसोयाबीन :- चांगले तूर पिक: - साधारणमुंग पिक: - साधारणउडीद पिक :- सर्वसाधारणतील पिक :-चागलेभादली :- रोगराई जास्तबाजरी पिक :- उत्तमतांदूळ पिक:- साधारण/ भावात तेजीमठ पिक सर्व- साधारणजवस् पिक:- साधारण /नासाडीलाख पिक:- साधारण भावत तेजीवाटाणा पिक:- साधारण गहू पिक: - साधारणहरबरा:- साधारण/भाव कमी

देशनैसर्गिक आपत्ती संरक्षण खाते मजबूत राहीलपरकीय देशाचा त्रास राहीलआर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट राहील

पाऊसजुन कमी व साधारण जुलै साधारण जून पेक्षा जास्तऑगस्ट सर्व साधारणसप्टेंबर  जास्त व् अवकाळी पाऊस

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस