रा. स्व. संघ : सलग तिसऱ्यांदा निवडनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांची तिसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे. नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत जोशी यांच्या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले़ सरकार्यवाह हे सरसंघचालकानंतर दुसऱ्या क्रमाकांचे महत्त्वाचे पद आहे़ बाळासाहेब देवरस, हो. वे. शेषाद्री यांनी याअगोदर तीनहून अधिक वेळा सरकार्यवाहपदाची जबाबदारी पार पाडली आहे. संघात सरकार्यवाहांच्या मदतीला चार सह सरकार्यवाह असतात. प्रथेनुसार त्यांची निवड सरकार्यवाहच करतात. जोशी आपल्या चार सहकाऱ्यांची निवड रविवारपर्यंत करतील, असे संकेत नंदकुमार यांनी दिले. सध्या दत्तात्रय होसबळे, कृष्ण गोपाळ आणि सुरेश सोनी असे तीन सहसरकार्यवाह आहेत. जोशी या तिघांनाही कायम ठेवतील, असे समजते. केरळचे के. सी. कन्नन हे चौथे सह सरकार्यवाह होते. परंतु संघाच्या तत्वप्रणालीच्या विरोधात त्यांनी विवाह केल्याने त्यांना त्या पदावरून दूर केले गेले होते. अ.भा. बौद्धिकप्रमुख भागय्या यांना त्या जागेवर नेमले जाऊ शकते, असेही समजते.
भय्याजी जोशी यांची सरकार्यवाहपदी फेरनिवड
By admin | Updated: March 15, 2015 02:21 IST