शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेलो नाही! बाळासाहेब थोरातांनी सांगितला त्यांच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 14:24 IST

...यामुळे हा माझ्या राजकारणाचा टर्निक पॉइंट आहे. मी भाऊसाहेबांमुळे काँग्रेसमध्येच थांबलो आणि मला माझ्या पक्षानेही खूप संधी दिली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावे, असे आपल्या मनात चालले होते. तेव्हा महाराष्ट्रात एकंदर पवार साहेबांचीच हवा दिसत होती आणि पुढे आमदारकीच्या निवडणुकाही होत्या. मात्र, आपण भाऊसाहेबांमुळे पवारांसोबत राष्ट्रवादीत जाऊ शकलो नाही आणि काँग्रेसमध्येच थांबलो. हाच आपल्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट ठरला, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ते लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते. (Bhausaheb did not allow me to join NCP with Sharad Pawar, Congress leader Balasaheb Thorat stated the turning point of his politics)

थोरात म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 ला झाली. पवार साहेबांचे आणि माझे नाते जिव्हाळ्याचे होते. भाऊसाहेबांचे आणि माझे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. मी त्यांचा लाडका आमदार होतो. तेव्हा आमदारकीची निवडणूकही आली होती. भाऊसाहेब थोडे तात्विक विचाराचे होते. त्यांनी सांगितले, की तुला काँग्रेस पक्ष सोडता येणार नाही. तेव्हा मी म्हणालो होतो, की महाराष्ट्रात एकंदर पवार साहेबांचेच वातावरण दिसत आहे. पुढे आमदारकीची निवडणूक आहे. पण ते थोडे कम्यूनिस्ट टाइपचे होते. ते म्हणाले, म्हणजे तू काय आमदारकीसाठी राजकारण करतोय का? तत्वाचा विषय असतो, विचारांचा विषय असतो. तेव्हा त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि मी राष्ट्रवादीत न जाता काँग्रेसमध्येच थांबलो." 

शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...

यामुळे हा माझ्या राजकारणाचा टर्निक पॉइंट आहे. मी भाऊसाहेबांमुळे काँग्रेसमध्येच थांबलो आणि मला माझ्या पक्षानेही खूप संधी दिली. आजही जेव्हा मी शरद पवारांना भेटतो तेव्हा अनेक वेळा ते भाऊसाहेबांच्या आठवणी काढतात. आम्ही राजकीय दृष्ट्या जरी वेगळ्या मार्गाने गेलो असलो, तरी एकमेकांबद्दलचा आदर कधीही कमी झाला नाही, असेही थोरात यावेळी म्हणाले. 

यावेळी थोरातांनी, चित्रपटांवरही भाष्य केले. कंगना, रनवीर कपूर, ऋतिकचे सिनेमा त्यांना आवडतात, असे त्यांनी सांगितले. तसेच, कलाकृती म्हणून आपण सिनेमा पाहतो, असेही ते म्हणाले. 

...म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो -आपल्या शांत स्वभावासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो. यासाठी माझा शांत स्वभावही कारणीभूत असेल, कारण मी कुणाला, फारसा दुखावण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही. पण याचा तोटाही जास्त आहे याचा, कधी अशांतही झाले पाहिजे. ते होत नसावा हा तोटा आहे माझा. त्यामुळे तोटाही कधी होत असेल. कधी कधी लवकर गरम होणारे जे असतात, त्यांच्यासाठीही काही फायदे असतात काही तोटे असता. प्रत्येक स्वभावाचे काही फायदे काही तोटे आहेत."

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस