शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या स्मारकाचे १४ एप्रिलला भूमिपूजन

By admin | Updated: December 1, 2014 02:32 IST

राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली.

मुंबई : राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली. स्मारकाप्रकरणी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल भाजपा सरकारचे आभार मानण्यासाठी आज सायंकाळी दादरच्या इंदू मिलजवळ सामिजक समता मंचच्या वतीने राजव्यापी मेळाव्याचे आयोजन सामाजिक समता मंचचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांनी केले होते. या वेळी तावडे म्हणाले की, स्मारकासाठी केंद्र सरकारला साधे ‘अंडरटेंकिंग’चे पत्रही पूर्वीच्या सरकारने दिले नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते केंद्राला दिल्याने पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल. स्मारकासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी वेळोवेळी होत आहे. आघाडी सरकारने या मागणीकडे कायम दुर्लक्ष केले. कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशीष शेलार, आ. भाई गिरकर यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत उभारण्यासाठी कांबळे यांनी अरबी समुद्रात १०० एकर भरणी करावी, या मागणीसाठी सर्वप्रथम १९९८ ला अरबी समुद्रात मूठभर माती टाकण्याचे आंदोलन छेडले होते. स्मारकाच्या उभारणीसाठी राज्यातील ४०० खेड्यांमधून जनजागृती, आंदोलने व मोर्चे काढले होते, अशी माहिती कांबळे यांनी या वेळी दिली. (प्रतिनिधी)> नव्या सरकारने ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक लवकर उभारण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करावी ही सामिजक समता मंचचच्या मागणीचे स्मरण सरकारला देण्यासाठी दादर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, असे ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांनी सांगितले.