पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:34 IST2025-10-16T16:33:38+5:302025-10-16T16:34:50+5:30
Supriya Sule: पवार कुटुंबियांनी यावर्षी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला असून त्यामागचे कारण खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
पवार कुटुंबियांनी यावर्षी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. सुप्रिया सुळे यांच्या काकू भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे पवार कुटुंबांनी यावर्षी दिवाळी साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त…
— Supriya Sule (@supriya_sule) October 16, 2025
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी लिहिले, "आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आमच्यासाठी आईसमान होत्या. त्यामुळे आम्ही पवार कुटुंबाने यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि पाडव्यानिमित्त होणारा सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम यावर्षी होणार नाही. कृपया याची नोंद घ्या. आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो," असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
भारती पवार यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आणि त्यांचे वय ७७ वर्ष होते. त्या गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ आजारी होत्या आणि मार्च महिन्यात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पवार कुटुंबासाठी त्या अत्यंत आदरणीय होत्या, आणि त्यांच्या निधनामुळे कुटुंबाने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.