शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

भन्साळींनी 'पद्मावती'साठी रात्रीची सुरक्षा नाकारली होती

By admin | Updated: March 16, 2017 01:50 IST

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'पद्मावती' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रात्रीच्यावेळी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 -  बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'पद्मावती' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रात्रीच्यावेळी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता, असे राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. 
कोल्हापुरातील पन्हाळगडावरील मसाई पठारावर 'पद्मावती' या सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला विरोध करत काही अज्ञातांनी सेटला मंगळवारी रात्री आग लावली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. 
याप्रकरणी दीपक केसरकर म्हणाले की, संजय लीला भन्साळी यांनी 'पद्मावती' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रात्रीच्यावेळी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सुरक्षतेसाठी दिवसा एका पोलीस अधिका-यासह पाच हवालदार देण्यात आले होते. मात्र, सेटची जाळपोळ केल्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता एका पोलीस अधिका-यासह 12 हवालदार असणार आहेत. 
यापूर्वीही जयपूरमध्ये 'पद्मावती' सिनेमाच्या सेटवर तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे संजय लीला भन्साळी यांना तेथील चित्रीकरण थांबवावे लागले होते. राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी या सिनेमाच्या सेटवर तोडफोड करून संजय लीली भन्साळी यांना मारहाण सुद्धा केली होती.
तेराव्या शतकात तत्कालीन दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने चितोडगड येथील शिशमहालात राणी पद्मिनीची एक झलक पाहिली होती. यादरम्यान राणी पद्मिनीने या गडावरच जोहार केला होता. या पार्श्वभूमीवर  'पद्मावती'चे चित्रीकरण जयपूर येथे सुरु असताना संघटनेने तोडफोड केली होती. पाठोपाठ चितोडगडमधील ऐतिहासिक शिशमहालातील आरसेही फोडले होते. या घटनेचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटले होते.