रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:31 IST2025-09-05T16:29:33+5:302025-09-05T16:31:29+5:30

सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी या नवीन सेवेचा वापर करावा, असे आवाहन बेस्टकडून करण्यात आले.

BEST launches New AC Bus route via Coastal Road, linking South Mumbai and Oshiwara | रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?

रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाने मार्ग क्रमांक ए-८४ वर एक नवीन वातानुकूलित बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (संग्रहालय) ते ओशिवरा डेपो दरम्यान धावेल आणि नुकत्याच सुरू झालेल्या स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) द्वारे दोन्ही भागांना जोडेल. ही सेवा उद्यापासून (6 सप्टेंबरपासून) प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे.

ए-८४ मार्ग प्रवाशांना दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील प्रमुख ठिकाणांना जोडणारा आरामदायी प्रवास पर्याय प्रदान करेल. ही एसी बस चर्चगेट स्टेशन (अहिल्याबाई होळकर चौक), वरळी सी फेस, वरळी डेपो, माहीम, खार स्टेशन रोड (प), सांताक्रूझ डेपो, विलेपार्ले, अंधेरी स्टेशन (प), शिवाजी पार्क, ओशिवरा ब्रिज आणि ओशिवरा डेपो येथून जाईल.

बेस्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असेल आणि दिवसभर ४० ते ४५ मिनिटांच्या अंतराने धावेल. ओशिवरा डेपोहून पहिली बस सकाळी ७.१५ वाजता आणि शेवटची बस संध्याकाळी ५.२० वाजता सुटेल, तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (संग्रहालय) येथून बस सकाळी ८.५० वाजता सुटतील आणि संध्याकाळी ७.१५ पर्यंत धावतील. 

या सेवेसाठी भाडे किमान १२ रुपये आणि कमाल ५० रुपये निश्चित करण्यात आले. सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी या नवीन सेवेचा वापर करावा, असे आवाहन बेस्टकडून करण्यात आले.

Web Title: BEST launches New AC Bus route via Coastal Road, linking South Mumbai and Oshiwara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.