शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम असल्याने तरूणाला नाकारली नोकरी

By admin | Updated: May 21, 2015 15:17 IST

हि-यांची निर्यात करणा-या कंपनीने मुंबईतील एका तरूणाला तो मुस्लिम असल्याने नोकरी देण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ -  सरकार ' सबका साथ सबका विकास' असा नारा देत असतानाच मुंबईतील एका तरूणाला तो मुस्लिम असल्याने नोकरी नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झिशान अली असे त्या तरूणाचे नाव असून त्याने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. झिशानने आपल्या दोन मित्रांसह 'हरे कृष्णा एक्स्पोर्ट्स' या हि-यांची निर्यात करणा-या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र 'आम्ही फक्त बिगर-मुस्लिम उमेदवारांनाच नोकरी देतो' असा मेल पाठवत या कंपनीने त्याला नोकरी देण्यास नकार दिला. कंपनीच्या या धार्मिक भेदभावामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे धक्का बसलेल्या झिशानने या अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला आणि सोशल नेटवर्किंग साईट्वर कंपनीचा रिप्लाय पोस्ट केला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसमावेशक विकासाची भाषा करत असतानाच नोकरी देणा-या कंपन्या असे भेदभाव करणारे वर्तन करतात. माझ्याकडे पुरेसे शिक्षण नव्हते तर कंपनीने मला तसे सांगायला हवे होते, पण नोकरी ने देण्यासाठी त्यांनी दिलेले ( धर्माचे) कारण अतिशय चीड आणणारे आहे ' अशी उद्वीग्न प्रतिक्रिया झिशानने दिली आहे.  
मात्र 'झिशानला पाठवण्यात आलेला ई-मेल चुकीने पाठवण्यात आल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले. ज्या कर्मचा-याने झिशानला मेल पाठवला, तो कर्मचारी अद्याप प्रशिक्षण घेत आहे. नोकरी देताना आपण कोणताही धार्मिक भेदभाव करत नाही,' असा दावाही कंपनीने केला आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपासासाठी पोलिस त्या कंपनीत दाखल झाले आहेत.