शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

दोन कुटुंबांवरील बहिष्कार मागे

By admin | Updated: December 19, 2014 05:05 IST

मुरूड तालुक्यातील शिघे्र गावातील जगदीश मांदाडकर आणि शिरगावमधील कृष्णा सातमकर यांच्या कुटुंबाची वाळीत प्रकरणातून मुक्तता करण्यात आली आहे

जयंत धुळप, आविष्कार देसाई, अलिबागमुरूड तालुक्यातील शिघे्र गावातील जगदीश मांदाडकर आणि शिरगावमधील कृष्णा सातमकर यांच्या कुटुंबाची वाळीत प्रकरणातून मुक्तता करण्यात आली आहे. रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक राजा पवार यांनी दोन्ही गावांत ग्रामस्थांची विशेष बैठक घेऊन सामोपचाराने ही दोन्ही प्रकरणे मिटवली आहेत.मुरूड तालुक्यातील वाळीत प्रकरण सामंजस्याने मिटविण्यात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिसांना यश आले आहे. ग्रामस्थ आणि वाळीत टाकलेल्या कुटुंबांची मने जुळल्याने अन्य बहिष्कृत प्रकरणासाठी हे सकारात्मक पाऊल ठरणार आहे. शिरगावमधील कृष्णा सातमकर यांना गावकीने समाजातून बहिष्कृत केले होते. याबाबतची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. माध्यमांनी हा विषय लावून धरल्याने जिल्ह्यातील वाळीत प्रकरणे मोठ्या संख्येने पुढे येऊ लागली. अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेने सादर केलेल्या वाळीत प्रथा निर्मूलन अभियानाची नुकतीस घोषणा झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन अशा अनिष्ट प्रथा मोडीत काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिरगावातील प्रकरण हाताळण्यासाठी तक्रारदार कृष्णा सातमकर आणि गावकी पंचकमिटीचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील यांच्यात चर्चा घडवून आणून वाद मिटविला. यासाठी लक्ष्मण मोरे, सहदेव सातमकर, संदीप सातमकर आणि वळके ग्रामपंचायत सदस्य किशोर काजरे शिरगाव ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.शिघे्र गावांतील वाळीतग्रस्त जगदीश मांदाडकर कुटुंंबीय आणि गावकीचे पंच जनार्दन मांदाडकर, रामा पाटील, रामजी पाटील, अनंत पाटील, मंगेश पाटील, धोंडूराम पाटील, नरेंद्र पाटील यांच्यात संयुक्त बैठक झाली. या वेळी ही वाईट प्रथा बंद करण्यासाठी सामोपचाराची भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचा गांभीर्याने विचार करून गावकीने बहिष्कार मागे घेतल्याचे सांगितले.