शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासमाला सुरू : शिक्षण विभागाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 21:16 IST

 शाळा बंद मात्र दररोज मिळणार ऑनलाईन शिक्षण

ठळक मुद्दे दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑडिओ बूक व रेडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा विचार

पुणे: कोरोनामुळे जाहीर केलेल्या  लॉकडाऊन (बंद) च्या काळात विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास थांबू नये यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोज विविध विषयाची ऑनलाईन अभ्यासमाला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून  (दि.13)मराठी विषयाने या अभ्यासमालेला  सुरूवात करण्यात आली आहे, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी संगितले.

राज्यातील शाळांना सुट्टी असली तरी अनेक खासगी व सरकारी शाळांकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. तर काही शाळा नियमितपणे ऑनलाईन वर्ग घेत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच आहे.परतु, राज्याच्या शिक्षण विभागाने  पुढाकर घेत सर्व भाषेतील व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्य पुस्तकावर आधारित ऑनलाईन अभ्यासमाला सुरू केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिकता येणार आहे.'एससीआरटीई'  कडूनसोमवारी पहिल्याच दिवशी   मराठी विषयाचे पाठ शिकण्यासाठी देण्यात आले. इयत्ता पहिलीसाठी पाठ वाचन, इयत्ता दुसरीसाठी ' फुग्या रे '  हा पाठ , इयत्ता तिसरीला ' ट्राफिकदादा ' पाठ,इयत्ता  चौथीला ' आभाळमाया' हा पाठ तर पाचवीला 'पाण्याची गोष्ट' , सहावीला 'नवा पैलू' , सातवीला 'कोळीण' , आठवीसाठी 'गे मायभू' हा पाठ तर नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 'वनवासी' हा पाठ दिला. पाठांसह अनेक घटक दीक्षा अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. कोव्हिड-१९ (कोरोना) च्या साथीमुळे शाळा बंद आहेत. तसेच इयत्ता अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत.असे असले तरी विद्यार्थी घरी शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन पालकांकडून काही गोष्टी शिकत आहेत. प्रत्येक जण सतत काही ना काही तरी शिकतच असतो. परंतु, आता ' एससीआरटीई' ने दीक्षा ऍप च्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने दररोज शालेय अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना घर बसल्या मोबाईलवर विविध गोष्टी शिकायला मिळणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी घरीच थांबा आणि सुरक्षित रहा, असेही आवाहन त्यांनी केले.----------'ऑनलाईन अभ्यासासाठी  दीक्षा अ‍ॅप https://bit.ly/dikshadownload लिंक वरून डाऊनलोड करता येते.---------

पुढील काळात ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने व दूरचित्रवाणी संच (टीव्ही) व रेडिओ च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. दीक्षा अ‍ॅपसाठी नेटवर्क असणे गरजेचे आहे.परंतु, काही दूर्गम भागात नेटवर्क बाबत अडचणी आहेत.त्यामुळे सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास दूरचित्रवाणी संचावरून विद्यार्थ्यांना शिकवण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत . तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑडिओ बूक व रेडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा विचार केला जात आहे.- दिनकर पाटील,संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाonlineऑनलाइनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस