शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

बीड : जय महेश कारखान्याने अखेर कामगारांना घेतले कामावर

By admin | Updated: July 19, 2016 20:33 IST

माजलगाव येथे खाजगी तत्त्वावर चालणाऱ्या जय महेश कारखान्याने अखेर माघार घेत काढून टाकलेल्या दोनशे कामगारांना मंगळवारी परत कामावर घेतले. याबाबत सोमवारी

सर्वात प्रथम लोकमत ऑनलाईनवर झळकली होती बातमी.

बीड - माजलगाव येथे खाजगी तत्त्वावर चालणाऱ्या जय महेश कारखान्याने अखेर माघार घेत काढून टाकलेल्या दोनशे कामगारांना मंगळवारी परत कामावर घेतले. याबाबत सोमवारी कामगारांनी कारखानास्थळी जोरदार निदर्शने केली होती.माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथे असलेल्या जय महेश साखर कारखान्याने ह्यलिव्ह आॅफह्णच्या नावाखाली चक्क दोनशे कामगारांना कुठलीही पूर्व कल्पना न देता कामावरुन काढून टाकले होते. दोनशे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. कामगारांच्या आंदोलनाची दखल माध्यमांनी घेतली होती. परिणामी जय महेश साखर कारखाना प्रशासन खडबडून जागे झाले.कामगार, कारखाना व्यवस्थापन यांच्यातील वाद यापूर्वी देखील वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे. मात्र यावेळी कारखाना प्रशासनाने मागचा-पुढचा विचार न करता चक्क दोनशे कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला होता. यामुळे गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.कामगारांचे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे दिसून येताच कारखाना प्रशासनाने मंगळवारी दोनशे कामगारांना पुन्हा कामावर घेतले आहे.  यामुळे गोरगरीब कामगारांच्या कुटुंबांची उपासमार टळली आहे.नोटीस चिकटवून केले होते कमी..जय महेश साखर कारखाना प्रशासनाने कारखान्याच्या गेटवर काढून टाकलेल्या कामगारांची नावे व नोटीस चिकटवून काढून टाकल्याचे जाहीर केले होते. ही नोटीस आणि यादी पाहताच कामगार हादरुन गेले होते. आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे कामगारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अन्यायाविरोधात तडकाफडकी आवाज उठविला. लढ्याला यश आले आहे.  कारखान्याची अर्थिक स्थिती खराब आहे. कामगारांचा तात्पूर्ता ह्यलिव्ह आॅफह्ण दिला होता. यापुढे लेबर कोर्टाचा जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. कामगारांना कायमचे काढले नव्हते- एस. राधाकृष्णन, जय महेश कारखाना उपाध्यक्ष