शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

"संविधान आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा", नाना पटोलेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 13:34 IST

Nana patole: ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता तेच लोक आज सत्तेवर आहेत. या विचारधारेचे लोक दररोज संविधानाची हत्या करत आहेत. आपला राष्ट्रध्वज तिरंगा मानाने डौलत ठेवायचा असून, संविधान व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा.

मुंबई - देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, अनेकांनी बलिदान दिले, त्याग केला. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे पण ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता तेच लोक आज सत्तेवर आहेत. या विचारधारेचे लोक दररोज संविधानाची हत्या करत आहेत. आपला राष्ट्रध्वज तिरंगा मानाने डौलत ठेवायचा असून, संविधान व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.  

काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला, प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी ध्वजारोहण करून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पूर्वसंध्येला काही लोकांनी काळा दिवस पाळला, या लोकांची विचारधारा पहा. या लोकांचे स्वातंत्र्य चळवळीत काहीही योगदान नाही.खोटे बोलून सत्तेत आले व मागील ९ वर्षांपासून देशाची संपत्ती विकून देश चालवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सर्व सामान्य जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. त्या संविधानाचा रोज खून केला जात आहे. भय, भ्रष्टाचारातून सत्ता स्थापन करायाची हेच काम सुरु आहे. ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांनाबद्दल जी भाषा वापरली जात असे तीच भाषा आज वापरली जात आहे. जनतेला पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचे काम सुरु आहे. बलाढ्य, शक्तीशाली, अत्याचारी ब्रिटिशांना काँग्रेसने देशातून हाकलून लावले आज पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे, जनतेने सावध रहावे, सजग रहावे.

मणिपूर जळत आहे, त्यावर पंतप्रधानांनी संसदेत शब्द काढला नाही, मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली पण त्यावर चकार शब्द न काढता काँग्रेसवर टीका करत हास्य विनोद करणारा असंवेदनशील पंतप्रधान देशाने पाहिला. देशाला पुन्हा पारतंत्र्यात लोटण्याचे काम सुरु आहे, हा धोका ओळखा. भारताला महासत्ता बनवण्याचे काँग्रेसचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार रहा, असे आवाहन पटोले यांनी केले

लाल किल्यावरून तरी खोटं बोलू नका पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, मी पुन्हा लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवणार अशी भाषा करणारे अहंकारी आहेत. आपल्या देशात नेता मोठा नाही तर देशातील जनता मोठी आहे. कोणाला निवडून आणायचे व कोणाचा पराभव करायचा हा जनतेचा हक्क आहे. बड्या-बड्या नेत्यांचा पराभव जनतेने केला आहे, त्यामुळे ही अहंकारी भाषा अयोग्य आहे. मागील ९ वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसला शिव्या देण्याशिवाय त्यांनी दुसरे काय काम केले हे सांगावे, असा प्रश्न पटोले यांनी विचारला. आता काँग्रेसला शिव्या देऊन मोदी आपले अपयश लपवू शकणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाIndependence Dayस्वातंत्र्य दिन