एका दिवसासाठी भाजपचे नेते होऊन बघा; चंद्रकांत पाटलांची पत्रकारांना ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 16:51 IST2018-09-08T16:50:41+5:302018-09-08T16:51:47+5:30
गणेश उत्सव काळात पनवेल ते झाराप रस्त्यावर बांधकाम विभाग पेट्रोंलिग करणार असून प्रत्येक पथकाकडे 50 किलो मीटरचा परिसर देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

एका दिवसासाठी भाजपचे नेते होऊन बघा; चंद्रकांत पाटलांची पत्रकारांना ऑफर
सावंतवाडी : युतीमधील मित्रपक्षांसोबत कसरत करत चार वर्षे सत्तेत आहोत. पुढील वर्षही पूर्ण करू. तुम्ही एक दिवसासाठी भाजपाचे नेते व्हा, मग या सर्व पक्षांना कसे सोबत घेऊन पुढे जावे लागते हे तुम्हाला कळेल, अशी गंमतीशीर ऑफर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना देऊन टाकली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरही शेजारी उपस्थित होते.
गणेश उत्सव काळात पनवेल ते झाराप रस्त्यावर बांधकाम विभाग पेट्रोंलिग करणार असून प्रत्येक पथकाकडे 50 किलो मीटरचा परिसर देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले.
एक दिवसासाठी भाजपाचे नेते व्हा. शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर, खोत, राजू शेट्टी यांचा समतोल साधत कसे पुढे जावे लागते हे लक्षात येईल असे पाटील म्हणाले.
भाजपने यशस्वीपणे समतोल साधला आणि 4 वर्षे पूर्ण केली. पुन्हा तो समतोल साधला जाईल. शिवसेनेसह सर्व मित्र पक्ष आणि आले तर राजू शेट्टी यांनाही पुन्हा सोबत घेऊन पुढच्या निवणुका लढवू, असेही सुतोवाच पाटील यांनी केले.