शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तापाने फणफणली

By admin | Updated: August 22, 2014 23:37 IST

शहर व तालुक्यात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

बारामती : शहर व तालुक्यात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यूसह अन्य आजारांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयांत मागील आठवडाभरात रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सव्रेक्षण सुरू केले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जंतुनाशक फवारणी केली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागील आठवडय़ात जवळपास 8 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तालुक्यातील उंडवडी सुपे येथे 2 रुग्ण डेंग्यूचे आढळले.
1क्क् ते 15क् हून अधिक रुग्ण थंडीतापाने बेजार आहेत. शहरातील ठरावीक भागांतच सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत दखल घेतली जात आहे. अनेक भागांत कच:यांचे ढीग साठलेले असतात.  पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाण्याचे डबके साठतात. या पाण्यातच डेंग्यूचे डास तयार होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संपूर्ण बारामती शहरात व्यापक स्वरूपात जंतुनाशक फवारणी, फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करणो आवश्यक आहे, त्याकडे मात्र नगरपालिकेच्या माध्यमातून दुर्लक्ष होत आहे, अशी नागरिकांची भावना आहे. 
मात्र, बारामती नगरपालिकेच्या आरोग्य  विभागातर्फे शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. बारामती शहरात विषाणूजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, नागरिकांनी स्वच्छतेच्या बाबतीत नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांनी केले आहे.
 
47 जण उपचार घेऊन घरी सोडण्यात आले आहेत, तर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय परिसरात वास्तव्यास असणा:या ज्येष्ठ नागरिकांवर पुणो शहरातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. या ज्येष्ठ नागरिकांनादेखील घरी सोडण्यात आले आहे. मात्र, त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 
 
बारामती शहरात सर्वच ठिकाणी डेंग्यूला कारणीभूत ठरणा:या डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. या ठिकाणी पाणीसाठे स्वच्छ करून धुरळणी करण्यात येत आहे. उंडवडी सुपे येथे दोन डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
- डॉ. महेश जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी