शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

बँक ऑफ महाराष्ट्राचे कंपन्यांनी थकविले दहा हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 11:50 AM

बँकेचे तब्बल १६,६५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून, त्यात बड्या कॉर्पोरेट कंपन्यांचा वाटा तब्बल ९ हजार ९४३ कोटी आहे.

ठळक मुद्दे पुढील काळामधे रिटेल, कृषी, लघु-मध्यम उद्योगला प्राधान्य देण्यात येणार बँकेच्या व्यवसायात पावणेसहा टक्क्यांनी वाढ

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रने गेल्या वर्षभरात अनुत्पादक खात्यातील कर्जाचे प्रमाण (एनपीए) १,१५० कोटी रुपयांनी कमी करण्यात यश मिळविले आहे. मात्र, अजूनही बँकेचे तब्बल १६,६५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून, त्यात बड्या कॉर्पोरेट कंपन्यांचा वाटा तब्बल ९ हजार ९४३ कोटी आहे. खालोखाल लघु-मध्यम उद्योग व कृषी कर्ज खात्यांचा क्रमांक लागतो.आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा अहवाल व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांनी सोमवारी सादर केला. व्यवस्थापकीय संचालक ए. सी. राऊत, हेमंत टम्टा उपस्थित होते. एनपीएचे प्रमाण वाढल्याने केंद्र सरकारने बँक ऑफ महाराष्ट्रसह सर्वच सार्वजनिक बँकांना मदतीचा हात दिला आहे. सरकारची बँकेतील मालकी ८७वरून ९२.९४ टक्के झाली आहे.गेल्या जून महिन्यात बँकेचा एनपीए १७,८०० कोटी रुपये होता. तो, १६,६५० कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडे ९,९४३, कृषी ३,३३४ आणि लघु उद्योग क्षेत्राची २ हजार ४२० कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत. एनपीए वसुलीसाठी बँक प्रशासनाने योजना आखली असून, त्या माध्यमातून वसुलीचे नियोजन आहे. तसेच, या पुढील काळामधे रिटेल, कृषी, लघु-मध्यम उद्योगला प्राधान्य देण्यात येणार आहे. कर्ज वितरणातील पन्नास टक्के वाटा याच क्षेत्रासाठी राहील........बँकेच्या एनपीएचे प्रमाण (रक्कम कोटी रुपयांत)क्षेत्र    जून २०१८      जून २०१९कृषी    २,८२०    ३,३३४गृह, शिक्षण, वाहन    ८,२८    ७,६८लघु-मध्यम उद्योग    २,९२४    २,४२०मोठे कॉर्पोरेट उद्योग    १०,२५२    ९,९४३.................बँकेच्या व्यवसायात पावणेसहा टक्क्यांनी वाढबँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवसायात २ लाख १९ हजार ४५८ कोटी ३३ लाख रुपयांवरून २ लाख ३१ हजार ९७२ कोटी ५२ लाख (५.७० टक्के) रुपयांची वाढ झाली आहे. एकूण ठेवींमधेदेखील १ लाख ३५ हजार ४१० कोटी ८५ लाखांवरून १ लाख ३८ हजार ९४० कोटी ९४ लाख (२.६१) रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, बँकेच्या संचालन नफ्यामधे ४७०.३२ कोटी रुपयांवरून ६५८.४५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील हा सर्वोच्च नफा आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रMONEYपैसा