'त्या'वेळी बाळासाहेबांनी फडणवीस यांना दिला होता 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 22:46 IST2018-09-08T22:45:41+5:302018-09-08T22:46:21+5:30

एखाद्या व्यक्तीचा एखादा गुण आवडला की बाळासाहेब ठाकरे त्या व्यक्तीचं कौतुक करायचे, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

Balasaheb had given Advice to Fadnavis during that time | 'त्या'वेळी बाळासाहेबांनी फडणवीस यांना दिला होता 'हा' सल्ला

'त्या'वेळी बाळासाहेबांनी फडणवीस यांना दिला होता 'हा' सल्ला

मुंबई: एखाद्या व्यक्तीचा एखादा गुण आवडला की बाळासाहेब ठाकरे त्या व्यक्तीचं कौतुक करायचे, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. चर्चा सुरू असताना मुद्देसूदपणे बोलण्याच्या आपल्या कौशल्याचं बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केलं होतं, असं मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या 'माझा सन्मान' पुरस्कार सोहळ्यात बोलताना सांगितलं. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते.


मी सुरुवातीला विविध वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांमध्ये पक्षाची भूमिका मांडायला जायचो. त्यावेळी मला बाळासाहेब यांनी एकदा टीव्हीवर पाहिलं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे हा मुलगा कोण, अशी विचारणा केली. हा मुलगा खूप चांगला बोलतो, असं बाळासाहेब पुढे म्हणाले होते, असंही फडणवीस यांनी सांगितलं.


मुख्यमंत्री हा किस्सा सांगत असताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला एक सल्लादेखील उपस्थितांना सांगितला. हा मुलगा खूप उत्तम बोलतो. फक्त जास्त ओरडू नको असा सल्ला त्याला दे, असं बाळासाहेबांनी त्यावेळी मला सांगितलं होतं, अशी आठवण उद्धव यांनी सांगितली. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
 

Web Title: Balasaheb had given Advice to Fadnavis during that time