शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

बॅगिंग तंत्रज्ञानाने पिकला आंबा

By admin | Updated: April 6, 2017 17:01 IST

संकेत गोयथळे रत्नागिरी, दि. 6 - गुहागर तालुक्यातील असगोली येथील शेतीनिष्ठ शेतकरी व साईमेरु अ‍ॅग्रो टुरिझमचे नित्यानंद झगडे यांनी १२० ...

संकेत गोयथळे

रत्नागिरी, दि. 6 - गुहागर तालुक्यातील असगोली येथील शेतीनिष्ठ शेतकरी व साईमेरु अ‍ॅग्रो टुरिझमचे नित्यानंद झगडे यांनी १२० दिवसात पूर्णपणे कागदाच्या पिशवीत (बॅगिंग तंत्रज्ञानाने) आंबा पिकवला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्यापर्यंत पोहोचली व जिल्हाधिकाऱ्यांनीही साधे परंतु प्रभावी तंत्रज्ञान अशा शब्दात झगडे यांचे कौतुक केले.नित्यानंद झगडे यांची असगोलीतील डोंगरात आंब्याची बाग आहे. सुमारे १५० ते २०० फूट उंच डोंगरात ते संपूर्ण कुटुंबासह आंब्याच्या बागेतच वास्तव्य करतात. शेतीतील वेगवेगळे प्रयोग करणारे तरुण शेतकरी अशी झगडे यांची ओळख आहे. उंच डोंगरात जलसंधारणासाठी बोअरिंग पुनर्भरणसह इतर प्रयोग करुन त्यांनी येथील पाणीपातळी वाढवली आहे. पूर्वी मार्चमध्ये पूर्णपणे कोरडी होणारी विहीर आज पाण्याने भरली आहे. या त्यांच्या प्रयोगाची तत्कालिन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांनीही पाहणी केली होती. नित्यानंद झगडे यांनी दापोली कृषी विद्यापीठामध्ये आंबा पुनरुज्जीवन व बॅगिंग तंज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे झगडे हे गेली तीन वर्षे हा प्रयोग करत आहेत. यासाठी त्यांना गुहागर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त झालेल्या आंब्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे या फळाला नैसर्गिक आकर्षक रंग, मनमोहक सुगंध असून, कसलाही डाग किंवा ओरखडा फळावर नाही. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाने फळमाशीच्या प्रादुर्भावापासून मुक्तता मिळते. झगडे यांनी यावर्षी आंबा पिकासाठी कुठलीही रासायनिक खते व कीटकनाशके वापरलेली नाहीत. केवळ शेणखत, गांडूळखत, जिवामृत व गोमूत्र याचा वापर करुन दर्जेदार आंबापीक घेण्यात यश मिळवले आहे.प्रशासनाकडून दखलनित्यानंद झगडे यांनी बॅगिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आंबा पिकवला आहे. या तंत्रज्ञानाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. साधे परंतु प्रभावी तंत्रज्ञान अशा शब्दात त्यांनी या तंत्रज्ञानाची प्रशंसा केली आहे.

https://www.dailymotion.com/video/x844v2m