शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

अजय बारसकर यांची 'प्रहार'मधून हकालपट्टी; मनोज जरांगे-पाटलांवर केले होते गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 9:05 AM

बारसकर हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते.

मनोज जरांगे-पाटील यांचे एकेकाळचे सहकारी आणि मराठा आरक्षण लढ्यातील त्यांचे साथीदार अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर अनेक गंभीर आरोप केले. जरांगे यांना कायद्याचे ज्ञान नाही. जरांगे हे रोज पलटी मारतात. सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटे बोलतात, असा आरोप बारसकर यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. शिशुपालाप्रमाणे जरांगेंचेही १०० अपराध आता भरले आहेत, असंही बारसकर म्हणाले.  

जरांगे यांनी २३ डिसेंबर रोजी गुप्त बैठक कन्हैया हॉटेलमध्ये घेतली. त्या बैठकीचा मी साक्षीदार आहे. तिथे जरांगे बैठकीत एक बोलले आणि बाहेर माध्यमांसमोर दुसरेच बोलले. मी योग्यवेळी ते जाहीर करेन, असेही बारसकर यांनी सांगितले. मुंबईला मोर्चा निघाला असताना रांजणगाव गणपती येथे पहाटे चार वाजता जरांगे यांची एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. या अधिकाऱ्याने या बैठकीचे रेकॉर्डिंग केले आहे. ते लवकरच निवृत्त होतील आणि जरांगेंचे बिंग फुटेल, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

बारसकर यांच्या या भूमिकेनंतर त्यांची प्रहार जनशक्ती पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. बारसकर हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते. प्रहार पत्रक काढत म्हणाले की, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचित करण्यात येते की, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांचा आदेश आहे की, पक्षामध्ये कोणीही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण किंवा नेत्यांबद्दल कोणतीही भूमीका मांडू नये. असे केल्यास त्या व्यक्तीचा प्रहार जनशक्ती पक्षाशी काहीही संबध राहणार नाही.

पक्षाची अधिकृत भुमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हेच स्वतः मांडतील. इतर कोणीही अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय आपली भूमिका मांडू नये. आज दि. २१/०२/२०२४ रोजी अजय महाराज बारस्कर यांनी जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांचेविषयी मांडली त्या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही किंवा काहीही संबध नाही. तरी अजय महाराज बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा पक्षाशी आजपासून काहीही संबध राहणार नाही, असं या पत्रकात म्हटलं आहे. 

मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप : जरांगे

तुकाराम महाराजांच्या आडून मला बदनाम करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. त्यांच्यात हिंमत नव्हती, कायद्याचे मला ज्ञान नाही तर कशाला आले सरकारचे प्रतिनिधी? बारसकर यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका, याला तुमच्या हेड ऑफीसने लगेच लाइव्ह घेतलेच कसे? याचा अर्थ यामागे सरकारचा मोठा ट्रॅप आहे, अशा शब्दात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. तो बारसकर बच्चूभाऊंसोबत वही घेऊन सहभागी झाला होता. उपोषणावेळी मी त्यांना बोललो होतो. व्यासपीठाच्या खाली व्हा. पण, हा ट्रैप आहे. माझ्याकडे सगळ्या रेकॉर्डिंगसुद्धा आहेत. आतापर्यंत मी गोड होतो, ट्रॅपमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा एक प्रवक्ता, त्याचा नेता सगळे आहेत. सरकारने ट्रॅप बंद करावा, त्यांना जड जाईल, असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार