बाबासाहेबांचे मौलिक विचारधन ‘जनता खंड’ प्रकाशनाच्या वाटेवर, CM फडणवीसांच्या हस्ते लवकरच प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 06:41 IST2025-04-14T06:40:18+5:302025-04-14T06:41:14+5:30

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025: महाराष्ट्र शासनाने १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली होती.

Babasaheb Ambedkar's fundamental thoughts 'Janata Khand' on the way to publication, will be published soon by Chief Minister Fadnavis | बाबासाहेबांचे मौलिक विचारधन ‘जनता खंड’ प्रकाशनाच्या वाटेवर, CM फडणवीसांच्या हस्ते लवकरच प्रकाशन

बाबासाहेबांचे मौलिक विचारधन ‘जनता खंड’ प्रकाशनाच्या वाटेवर, CM फडणवीसांच्या हस्ते लवकरच प्रकाशन

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचारधन असलेले जनता खंड व अनुवादित खंडाची छपाई करण्यात आली असून, त्यांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

महाराष्ट्र शासनाने १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली होती. या प्रकाशन समितीच्या माध्यमातून ‘डॉ. आंबेडकर रायटिंग आणि स्पीचेस’चे एकूण २२ खंड प्रकाशित झाले होते. त्यानंतर मात्र प्रकाशनाच्या कार्यात काही वर्षे खंड पडला होता.

२०२१ मध्ये स्थापन झालेल्या नवीन समितीने मात्र मागील तीन ते चार वर्षांच्या कालावधित मोठ्या प्रमाणात साहित्य प्रकाशित करण्याची कामगिरी केली आहे.

हे साहित्य झाले प्रकाशित

इंग्रजी खंड २३ (२०२३)

जनता खंड १-३, 

जनता ३ (२०२३ चा खास अंक)

जनता खंड ४-६

इंग्रजी खंड २, ६, ९ १३ व मराठी अनुवाद

सोर्स मटेरियल-१

इंग्रजी खंड २-६, ८, १०-१३, १५, १७-१८

‘जातीव्यवस्थेचे निर्मूलन’  नव्या आवृत्त्या.

या साहित्यावर काम सुरू

‘जनता’ चे ११ खंड, उर्वरित इंग्रजी खंडाचा अनुवाद, बाबासाहेबांच्या पत्रांचा आणखी एक खंड, बाबासाहेबांवर इंग्लंड, अमेरिकेच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध बातम्या व मुलाखती, इंग्लंड, अमेरिकेतील उपलब्ध दस्तऐवज.

बाबासाहेबांचे साहित्य आणि त्यांच्यावरील साहित्य संपदेवर वेगाने काम सुरू आहे. हे काम करण्याची संधी मिळणे, ही आनंदाची बाब आहे. -डॉ. प्रदीप आगलावे(सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती)
 

Web Title: Babasaheb Ambedkar's fundamental thoughts 'Janata Khand' on the way to publication, will be published soon by Chief Minister Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.