शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

राहुल जगतापांसमोर पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 2:26 PM

जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपरिषदेची निवडणुक बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच २०१४ मध्ये सर्वात तरुण आमदार ठरलेले श्रीगोंदायाचे  राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्यापुढे पुन्हा भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आवाहन असणार आहे. मागच्यावेळी तब्बल १३ हजार मतांनी नवख्या जगताप यांनी पाचपुतेंना पराभूत केले होते. त्यामुळे हा विजय २०१९ मध्ये जगताप कायम ठेवणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.

२०१४ मध्ये अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेले राहुल जगताप यांना श्रीगोंदा मतदारसंघातून पुन्हा बबनराव पाचपुतेंचा सामना करावा लागणार आहे. मोदी लाटेत सुद्धा जगताप यांनी ९९ हजार २८१ मतं मिळवत १३ हजार मतांनी पाचपुतेंना पराभूत केले होते. मात्र या पाच वर्षात पाचपुतेनी मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली आहे. त्यामुळे जगताप यांना यावेळी पाचपुतेंच मोठे आव्हान असणार आहे.

जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपरिषदेची निवडणुक बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत जरी नगराध्यक्षपदी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या शुभांगी पोते विजयी झाल्या असल्या तरीही, १८ पैकी ११ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. त्यातच गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून कमळ हातात घेतल्याने त्याचा फायदा सुद्धा पाचपुते यांना होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यावेळी जगताप आणि पाचपुते यांच्यात अटीतटीचा सामना होणार असल्यची चर्चा आहे.