राज्य उर्दू साहित्य अकादमीमध्ये अजीम नवाज राही

By Admin | Updated: September 2, 2015 02:13 IST2015-09-02T02:13:19+5:302015-09-02T02:13:19+5:30

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या प्रशासकीय सदस्यपदी प्रख्यात कवी अजीम नवाज राही यांची नियुक्ती.

Azim Nawaz Rahi in State Urdu Sahitya Akademi | राज्य उर्दू साहित्य अकादमीमध्ये अजीम नवाज राही

राज्य उर्दू साहित्य अकादमीमध्ये अजीम नवाज राही

बुलडाणा : उर्दू भाषेचा विकास, भाषेचे संवर्धन तसेच उर्दू आणि मराठी भाषेतील साहित्यिकांमध्ये वैचारिक संवाद घडून आणण्याच्या हेतूने कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या प्रशासकीय सदस्यपदी प्रख्यात कवी अजीम नवाज राही यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाने घोषित केलेल्या या १५ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी अल्पसख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे हे असून, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री हे उपाध्यक्ष आहेत. या समितीमध्ये राही यांचा समावेश झाल्याने बुलडाणा जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राचा गौरव झाला आहे. व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातील एकांत या कविता संग्रहाने राज्यभर नावाजलेल्या राही यांच्या कविता अमरावती, उत्तर महाराष्ट्र गोंडवाना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभ्यासाला आहेत हे विशेष.

Web Title: Azim Nawaz Rahi in State Urdu Sahitya Akademi