शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

"औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे केली’’, काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:02 IST

Hussain Dalwai News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत धक्कादायक दावा केला आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे केली होती, असा दावा हुसेन दलवाई यांनी केला आहे. 

मागच्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेलं बलिदान, तसेच कैदेत असताना मुघल बादशाह औरंगजेबाने त्यांचा केलेला छळ यांचं दाहक चित्रिकरण करण्यात आलं होतं. तेव्हापासून देशभरात औरंगजेबाविरोधात संतापाची भावना दिसून येत असून, औरंगजेबाची खुतलाबाद येथे असलेली कबर हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. या निमित्ताने इतिहासाचीही नव्याने घुसळण होत असून, दररोज नवनवे दावे केले जात आहेत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत धक्कादायक दावा केला आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे केली होती, असा दावा हुसेन दलवाई यांनी केला आहे. 

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हुसेन दलवाई म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी जरा औरंगजेबाचाही इतिहासही वाचावा. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली ती क्रुरता होती. त्याच्या भावालाही त्याने मारलं. दारा शिकोहची ज्याप्रमाणे हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे त्याने संभाजी महाराजांची हत्या केली. मात्र छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करताना त्यांची मनुस्मृतीप्रमाणे  हत्या कशी करावी याबाबत पंडित लोकांनी सांगितलं, त्यानुसार मग औरंगजेबाने त्यांची हत्या केली, असा दावा हुसेन दलवाई यांनी केला. ही बाब देवेंद्र फडणवीस मान्य करतील का? असा सवालही हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला. तुम्हाला वस्तुस्थिती अमान्य करून चालणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. 

 

टॅग्स :Chhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजHussein Dalwaiहुसेन दलवाईcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस