'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!

By विकास राऊत | Updated: June 17, 2025 14:00 IST2025-06-17T13:57:31+5:302025-06-17T14:00:23+5:30

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Attempted robbery by throwing stones at 'Samruddhi'; Incidents on Ch. Sambhajinagar to Nagpur route increased! | 'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!

'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!

विकास राऊत 
लोकमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या एका वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर ते नागपूरदरम्यान असलेल्या बोगद्यांमध्ये हा प्रकार होत असल्याचे त्यातून दिसते. वाहन थांबवून लुटीसाठी दगडफेक करण्याची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. यामुळे महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रात्री पोलिस गस्त व इमर्जन्सी सेवा वाढविण्याची गरज प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. 

व्हिडीओ नेमक्या कोणत्या तारखेचा आहे, हे समजत नाही; परंतु रविवारी व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तो सोमवारी व्हायरल झाला. रात्रीच्या सुमारास एका खासगी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता पुढे घेतल्याने अनर्थ टळला. 

कुठे होत आहेत घटना?
हर्सूल-सावंगी, लासूर स्टेशन, माळीवाडा, वैजापूर येथे इंटरचेंज व बोगद्याच्या मधोमध लुटमारीच्या घटना होत आहेत. 

दोन वर्षांतील घटना 
- छत्रपती संभाजीनगरलगत एका कुटुंबाचे वाहन अडवून सोने व इतर साहित्य लुटून मारहाण 
- वैजापूर, जांबरगाव शिवारात रात्री दोन प्रवाशांच्या वाहनावर दगडफेक; त्यात एक जण जखमी 
- करजना गावाजवळ मध्यरात्री ट्रॅव्हल बसवर दगडफेक 
- मेहकरजवळ एका कुटुंबाला अडवून रोख रक्कम व इतर साहित्य लुटले.    
- मेहकरजवळ मुंबईकडे जात असलेल्या कुटुंबास लुटले.

Web Title: Attempted robbery by throwing stones at 'Samruddhi'; Incidents on Ch. Sambhajinagar to Nagpur route increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.