शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवर अत्याचार

By admin | Updated: August 21, 2014 01:07 IST

मंगळवारी रात्री ९.३० वाजताची वेळ. मुलीच्या रडण्याचा आवाज कानी पडताच परिसरातील काही लोकांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला. एक सहा वर्षीय बालिका गावाच्या गोदरीत रक्ताच्या थारोळ्यात असह्य

सिंदी (रेल्वे) येथील घटना : शस्त्रक्रियेनंतर पीडिता अतिदक्षता विभागातवर्धा : मंगळवारी रात्री ९.३० वाजताची वेळ. मुलीच्या रडण्याचा आवाज कानी पडताच परिसरातील काही लोकांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला. एक सहा वर्षीय बालिका गावाच्या गोदरीत रक्ताच्या थारोळ्यात असह्य वेदनेने विव्हळत होती. हे दृश्य बघून सारेच अवाक् झाले. तिला लगेच्ं प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. नंतर तिला सेवाग्राम रुग्णालयात हलविले. कुण्यातरी नराधमाने अतिप्रसंग करुन तिची ही अवस्था केली असावी, असा संशय तपासात खरा निघाला. ही घटना सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे) येथील आहे.याप्रकरणी बुधवारी सायंकाळी इरफान शहा मजलिन शहा (२३) रा. लादेननगर सिंदी (रेल्वे) याला सिंदी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३७६ तसेच लहान मुलांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ३, ६, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सेलू तालुक्याचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी असलेले पोलीस उपअधीक्षक (गृह) आर. जी. किल्लेकर यांनी लगेच रुग्णालय गाठले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ते दिवसभर सिंदीत ठाण मांडून होते. त्यांच्या समक्ष तपासाची संपूर्ण प्रक्रिया पार पडली.सिंदी येथील एका वस्तीतील पीडित बालिकेचे कुटुंबीय रात्री गावातीलच एका नातेवाईकाकडे काही कामानिमित्त गेले होते. मुलगी घरी एकटीच होती. सुमारे अर्ध्या तासांनी वडिल घरी आले असता मुलगी घरात दिसली नाही. तिचा शेजाऱ्यांकडे शोध घेतला. मात्र कुठेच पत्ता लागला नाही. काही वेळातच गावातील काही लोकांना त्याच परिसरात मुलगी रक्ताच्या थारोळ्यात वेदनेचे विव्हळत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच तिच्या पित्याला बोलावून स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. बालिकेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवाग्रामला हलविण्याचा सल्ला दिला. सिंदी (रेल्वे) ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई ममता यांनी तिला रात्री १.३० वाजताच्या सुमारास सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती केले. दिवसभर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपीला अटक केली. त्याने घटनेची कबुली दिल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)