अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

By Admin | Updated: June 3, 2015 01:31 IST2015-06-03T01:31:31+5:302015-06-03T01:31:31+5:30

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून संतोष रंधवे (३१) यास श्रीरामपूरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश

Atrocities against minor girls; Accused | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

श्रीरामपूर (अहमदनगर) : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून संतोष रंधवे (३१) यास श्रीरामपूरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी मंगळवारी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
दंडाच्या २८ हजार रुपयांपैकी २६ हजार रुपये पीडित मुलीस देऊन २ हजार रुपये सरकारजमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. १६ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. पीडित मुलीचे वडील मोलमजुरी करतात. २४ डिसेंबर २०१४ रोजी पीडित मुलगी संगणक प्रशिक्षण क्लासला जाते, असे आईला सांगून बाहेर गेली; मात्र ती घरी परतलीच नाही. त्यानंतर पीडित मुलीच्या जवळच राहणारा संतोष रंधवे (३१) व ही मुलगी औरंगाबादजवळील वाळूजला नवरा-बायकोसारखे राहत असल्याचे निष्पन्न झाले. तेथे तिचे लैंगिक शोषण करण्यात आले.
तपासाधिकारी फौजदार सुधीर पाटील यांनी १७ जानेवारी २०१५ रोजी संतोषच्या भावाच्या मदतीने शोध घेऊन दोघांनाही मुंबईतून श्रीरामपूरला आणले. मुलीचा जबाब घेऊन संतोषविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यासोबत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. चार महिन्यांत खटला निकाली काढण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Atrocities against minor girls; Accused