शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ महाविद्यालयात आठवले यांना नो एन्ट्री!

By admin | Updated: April 23, 2016 03:34 IST

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयातील आनंद भुवनमध्ये खासदार रामदास आठवले यांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी प्रवेश नाकारला.

मुंबई : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयातील आनंद भुवनमध्ये खासदार रामदास आठवले यांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी प्रवेश नाकारला. चार वर्षांपूर्वी पोलीस आयुक्तांनी घातलेली बंदी मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने उठवल्याचे सांगत आठवले यांनी वास्तूचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती आलेली नसल्याने पोलीस आयुक्तांनी आठवले यांच्या प्रवेशास मज्जाव केला.पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आनंद भुवनमधील सिद्धार्थ महाविद्यालयाचा ताबा घेण्यासाठी सकाळपासून रिपाइंचे कार्यकर्ते जमले होते. दुपारी १२ वाजता कार्यकर्त्यांसह आठवले महाविद्यालयाचा ताबा घेणार होते. मात्र तत्पूर्वी पोलीस आयुक्तांनी आठवले यांच्यासोबत बैठक घेतली. न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येईपर्यंत आठवले यांना शांतता राखण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर येत आठवले यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.या वेळी आठवले म्हणाले की, आयुक्तांच्या विनंतीचा मान ठेवून न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच दोन दिवसांत कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाचा ताबा घ्यावा. महाविद्यालयात बोगस कागदपत्रे तयार करून घुसखोरी करणाऱ्यांविरोधात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)