नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:43 IST2025-07-01T12:41:10+5:302025-07-01T12:43:46+5:30

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्यावर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर विधानसभेत विरोधकांचा गोंधळ बघायला मिळाला.

Assembly Speaker Rahul Narvekar suspends Nana Patole from the Assembly | नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?

नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?

Nana Patole news: काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही कारवाई केली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानाचा मुद्दा नाना पटोलेंनी विधानसभेत उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोलेंवर निलंबनाची कारवाई केली.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर दुसऱ्या विषयाचे काम सुरू झाले असताना नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानांबद्दल संताप व्यक्त केला. मोदी तुमचे बाप असतील, राज्यातील शेतकऱ्यांचे नव्हे, असे म्हणत पटोले सभागृहात संतापले. 

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी -नाना पटोले

माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानांबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. त्यावरून प्रचंड गदारोळ सभागृहात झाला. त्यामुळे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. 

पटोले अध्यक्षांच्या अंगावर धावून गेले, सत्ताधारी संतापले 

कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी लावून धरली. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे त्यांच्या आसनावरून उठून विधानसभा अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेले. नाना पटोलेंनी राजदंडालाही हात लावला. अध्यक्षांच्या समोर उभे राहून माफीची मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले. 

दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि सत्ताधारी मंत्री, आमदार आक्रमक झाले. विधानसभा अध्यक्ष राहिलेल्या माणसाने विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे बरोबर नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

वाचा >>नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 

विरोधकांचा गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित केले. मात्र, विरोधी पक्षातील आमदार माफी मागण्याच्या मुद्द्यावर आक्रमक झाले. घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ सुरू होता. त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. 

Web Title: Assembly Speaker Rahul Narvekar suspends Nana Patole from the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.