शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Elections Results 2019: हर्षवर्धन जाधवांना 'एमआयएम'चा पाठींबा भोवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 14:02 IST

हर्षवर्धन जाधव २००९ पासून सलग दोन वेळा कन्नड मतदारसंघातून निवडणून आले आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आलेल्या निकालानंतर चर्चेत असलेल्या अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचे कारण ठरणारे व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा सुद्धा विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघातून पराभव झाला आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात जातीयसमीकरणाचे चित्र फिरले आणि हर्षवर्धन जाधवांना 'एमआयएम'चा मिळालेला पाठींबाचं त्यांना भोवला. त्यामुळे जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

हर्षवर्धन जाधव २००९ पासून सलग दोन वेळा कन्नड मतदारसंघातून निवडणून आले आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी आपले नशीब आजमावून पाहिले. तर याच निवडणुकीत मराठा फॅक्टरमुळे जाधवांनी दोन लाखाहून अधिक मते घेतली होती.यामुळे मतांचे विभाजन होऊन चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला व एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. जाधव यांच्यामुळेच जलील निवडून आल्याचे आरोप त्यांनतर शिवसेनेकडून करण्यात आले होते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्यात जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त विधान आणि एमआयएमनी दिलेला खुला पाठींब्यानंतर कन्नड मतदारसंघातील राजकरण तापल्याचे पाहायला मिळाले होते. मतदानाच्या दिवशी कन्नड शहरातील मुस्लीम मतदार जाधवांना एकतर्फी मतदान करत असल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर, इतर मतदार बिथरल्याने आपसुकच 'ती' मते उदयसिंह राजपूत यांच्या पारड्यात गेली.

ऐनवेळी दिलेल्या एमआयएमच्या पाठिंब्याने कन्नड मतदारसंघातील जातीयसमीकरणांना महत्व आले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जाधवांच्या सोबत असलेला मराठा फॅक्टर यावेळी शिवसेनेच्या सोबत उभा राहिला. त्यातच उद्धव ठाकरेंबद्दल कलेल्या विधानामुळे जाधवांना पाडण्यासाठी शिवसेनेकडूनही मोठ्याप्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे सलग दोन वेळा निवडून आलेल्या हर्षवर्धन जाधवांना हॅटट्रिक करता आली नाही.