संजय राठाेड यांचे मनपरिवर्तन करा; उद्धव ठाकरे यांनी साधला महतांशी संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 05:02 PM2022-06-29T17:02:36+5:302022-06-29T17:05:12+5:30

नागपूर संपर्क प्रमुखासह अमरावती जिल्हाप्रमुख पाेहरादेवीत!

ask to come back Sanjay Rathore; Uddhav Thackeray contacted Mahant after Eknath Shinde Revolt | संजय राठाेड यांचे मनपरिवर्तन करा; उद्धव ठाकरे यांनी साधला महतांशी संपर्क

संजय राठाेड यांचे मनपरिवर्तन करा; उद्धव ठाकरे यांनी साधला महतांशी संपर्क

Next

वाशिम : एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामध्ये दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघाचे आमदार संजय राठाेड यांचा समावेश आहे. संजय राठाेड यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी पाेहरादेवी येथील महंतांची भेट घेण्यासंदर्भात उध्दव ठाकरे यांनी नागपूर संपर्कप्रमुखासह काही जिल्हा प्रमुखांना पाेहरादेवी येथे जाण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. त्यावरुन २९ जून राेजी दुपारी ३.३० वाजता मान्यवरांनी महंत यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधला.

२९ जून राेजी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान नागपूरचे शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सुर्यवंशी यांच्यासाेबत  अमरावती जिल्हा प्रमुख श्याम देशमुख, राजेश वानखडे, सुधीर खराटे यांनी पाेहरादेवी येथे जाऊन महंत सुनील महाराज यांची भेट घेतली. यावेळी आमदार संजय राठाेड यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा अशी विणवणी केली. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुनील महाराज यांना संजय राठाेड यांना समजावून सांगण्याचे भ्रमणध्वनीवर भावनिक आवाहन केले.  सुनील महाराज यांनी ठाकरे यांना आम्ही सर्व जण बसून या विषयावर त्यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच ज्या पक्षाने आपल्याला माेठे केले त्यांच्यासाेबत असे न करण्याचे सांगताेय असा शब्द महंत सुनील महाराज यांनी ठाकरे यांना दिला. यावेळी आलेले शिष्टमंडळ पाेहरादेवी येथील  बंजारा धर्मगुरु बाबुसिंग महाराज, देवी सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबिरदास महाराज, जितेंद्र महाराज, शेखर महाराज यांची भेट घेणार आहेत.


१९ जून राेजी उध्दव ठाकरे यांनी महंतांना बाेलावून संजय राठाेड यांना मंत्रीपद देण्याबाबत चर्चा केली हाेती. त्यानंतरही संजय राठाेड यांनी बंडात सहभाग घेतला. त्यांना महतांनी समजावून सांगावे याकरिता मी व माझ्यासाेबत काही जिल्हाप्रमुखासह मी पाेहरादेवी येथे आलाे असून सकारात्मक चर्चा हाेत आहे.
- सुधीर सुर्यवंशी
शिवसेना, नागपूर संपर्क प्रमुख

Web Title: ask to come back Sanjay Rathore; Uddhav Thackeray contacted Mahant after Eknath Shinde Revolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.