Ashok Kharat case: भोंदूबाबा अशोक खरातसोबतचा माजी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:28 IST2026-03-27T13:26:52+5:302026-03-27T13:28:04+5:30
Hemant Godse Viral Video: भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Ashok Kharat case: भोंदूबाबा अशोक खरातसोबतचा माजी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ!
भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणात राजकारण्यांचे धाबे दणाणले असून, नाशिकचे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा अशोक खरातसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अशोक खरात हा माजी खासदार हेमंत गोडसे यांचा हात पाहून त्यांचे भविष्य सांगताना स्पष्टपणे दिसत आहे. खरातकडे भविष्य जाणून घेण्यासाठी आणि कामात यश मिळवण्यासाठी अनेक बडे नेते रांगा लावत होते, हे तपासात आधीच समोर आले होते. मात्र, गोडसे यांच्या या व्हिडिओमुळे आता प्रत्यक्ष पुरावाच समोर आला आहे.
नाशिक के “भोंदूबाबा” अशोक खरात का एक पुराणा वीडियो फिर से व्हायरल हो रहा है। इस वीडियो में वह माजी खासदार हेमंत गोडसे के हाथ को देखकर लोकसभा चुनाव से पहले उनका राजनीतिक भविष्य बताते दिख रहे हैं।#AshokKharat#ViralVideo#Maharashtrapic.twitter.com/PmHfV7werk
— Flash Video | Ramnath Deshmukh (@FlashVideo25) March 27, 2026
अध्यात्माच्या नावाखाली अनेकांना गंडा
अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस कसून तपास करत आहेत. या तपासादरम्यान खालील गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. अनेक राजकीय नेते स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी खरातच्या संपर्कात होते. निवडणुकीतील जय-पराजयाचे भाकीत जाणून घेण्यासाठी नेते त्याची भेट घेत असत. हेमंत गोडसे यांनी देखील खरातची भेट घेतल्याने, या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे दिसून येत आहे.
१५० हून अधिक महिलांवर अत्याचार
भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तब्बल १५० हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आल्यानंतर त्याची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली.अशोक खरात सध्या २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असून, विशेष तपास पथकाकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
हे देखील वाचा: तू मागील जन्मातील अप्सरा असल्याचे सांगत अत्याचार; आणखी एका महिलेनं गाठलं पोलीस ठाणे!
तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड
- खरातने भविष्य सांगण्याचे आमिष दाखवून १५० पेक्षा जास्त महिलांचे लैंगिक शोषण केले आहे.
- नाशिक पोलिसांनी आतापर्यंत ८ गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी ७ गुन्हे हे थेट महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत.
- गुन्हा दाखल केलेल्या ७-८ महिलांशिवाय इतर अनेक पीडित महिला अद्याप सामाजिक भीतीपोटी तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाहीत.
हे देखील वाचा: गर्भवती महिला, विद्यार्थिनींसह तरुणांनाही सोडलं नाही, अशोक खरात काळे कारनामे, पोलीसही हादरले
पोलिसांचे आवाहन
ज्या महिला या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकल्या आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा. पीडितांची ओळख गुप्त राखली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने पोलीस आणि एसआयटी प्रत्येक पुराव्याची सखोल चौकशी करत आहेत. खरातच्या कार्यालयाची झडती, मोबाईलमधील डेटा रिकव्हरी आणि पीडित महिलांचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.