Ashok Kharat : गुगलच्या 'मोस्ट सर्च्ड' कॅटेगरीत 'भोंदूबाबा' टॉपवर; लोक शोधताहेत अशोक खरातचे काळे कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:20 IST2026-03-25T16:19:22+5:302026-03-25T16:20:52+5:30

Ashok Kharat : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकामागून एक समोर येणाऱ्या धक्कादायक गोष्टींमुळे सर्वच जण हादरले आहेत.

Ashok Kharat case goes viral on internet nashik incident tops google trends within 72 hours | Ashok Kharat : गुगलच्या 'मोस्ट सर्च्ड' कॅटेगरीत 'भोंदूबाबा' टॉपवर; लोक शोधताहेत अशोक खरातचे काळे कारनामे

फोटो - tv9hindi

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकामागून एक समोर येणाऱ्या धक्कादायक गोष्टींमुळे सर्वच जण हादरले आहेत. विविध प्रकारच्या कर्मकांडांची आणि गैरप्रकारांची ही यादी इतकी मोठी आहे की, लोक याबद्दल गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च करत आहेत. याच कारणामुळे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता सोशल मीडिया आणि इंटरनेटवर मोठी खळबळ उडवून दिली आहे. गेल्या ७२ तासांत हे प्रकरण गुगल सर्चमध्ये सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या विषयांपैकी एक ठरलं आहे. लोकांच्या वाढत्या उत्सुकतेमुळे हे प्रकरण वेगाने 'मोस्ट सर्च्ड' कॅटेगरीमध्ये टॉपवर पोहोचलं आहे.

Google Trends च्या आकडेवारीनुसार, भोंदू बाबा प्रकरण 'ब्रेकआउट' श्रेणीमध्ये नोंदवले गेलं आहे. याचा अर्थ असा की, एखाद्या विषयावरील सर्चमध्ये अचानक प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे १७ मार्चपर्यंत अशोक खरातचं नाव सर्च ट्रेंडमध्ये कोठेही नव्हतं, परंतु अवघ्या तीन दिवसांत जबरदस्त उसळी घेत २० मार्च रोजी याने १०० च्या सर्वात जास्त सर्च स्कोअरचा टप्पा गाठला.

 "मी तुझं करिअर घडवेन, विरोध केल्यास वडिलांचा मृत्यू"; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा

२३ मार्चपर्यंत हा कल सातत्याने कायम होता, ज्यावरून हे स्पष्ट होतं की लोकांना या प्रकरणाची अधिक माहिती घ्यायची आहे. प्रादेशिक स्तरावर विचार केल्यास, सर्वाधिक सर्च नाशिकमधून करण्यात आले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतूनही मोठ्या प्रमाणात सर्च केलेलं पाहायला मिळालं.

अंधश्रद्धेचा बाजार! खरात बाबाच्या वर होता आणखी एक भोंदूबाबा; गंडादोरा देणाऱ्याचाही शोध सुरू

सर्च पॅटर्नवर नजर टाकली असता, '५८ व्हिडीओ', 'खरात न्यूज' आणि 'बॅकग्राउंड' यांसारखे कीवर्ड्स सर्वाधिक ट्रेंडमध्ये राहिले आहेत. यावरून असा संकेत मिळतो की, लोक केवळ या प्रकरणाचे ताजे अपडेट्स जाणून घेऊ इच्छित नाहीत, तर याशी संबंधित व्हिडीओ आणि आरोपीच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती मिळवण्यातही त्यांना प्रचंड रस आहे. 

दैवी शक्ती, खोलीत पवित्र आत्मा, तीर्थ, पूजा...; महिलांना 'असं' जाळ्यात अडकवायचा अशोक खरात

अशोक खरात नेमका कोण आहे? कोणत्या नेत्यांशी, अधिकाऱ्याशी त्याचा संबंध होता? कशासाठी प्रसिद्ध होता? अशा अनेक गोष्टीची लोक गुगलवर सर्च करत आहेत. एकंदरीत अशोक खरात प्रकरण आता केवळ स्थानिक राहिलं नसून संपूर्ण राज्यात चर्चेचा केंद्रबिंदू बनलं आहे. इंटरनेटवरील वाढता सर्च आणि सोशल मीडियावर होणारी चर्चा हे दर्शवते की, या प्रकरणाबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title : फर्जी गुरु अशोक खरात घोटालों के बीच गूगल खोज में सबसे ऊपर।

Web Summary : नाशिक के फर्जी गुरु अशोक खरात कथित कुकर्मों के कारण गूगल पर ट्रेंड कर रहे हैं। खोजों से वीडियो, पृष्ठभूमि और कनेक्शन में सार्वजनिक रुचि का पता चलता है, जिससे यह राज्यव्यापी सनसनी बन गया है।

Web Title : Fake guru Ashok Kharat tops Google searches amid scandals.

Web Summary : Ashok Kharat, a fake guru from Nashik, is trending on Google due to his alleged misdeeds. Searches reveal public interest in videos, background, and connections, making it a state-wide sensation.