Ashok Kharat Case: गर्भवती महिला, विद्यार्थिनींसह तरुणांनाही सोडलं नाही, अशोक खरात काळे कारनामे, पोलीसही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:40 IST2026-03-24T15:38:55+5:302026-03-24T15:40:28+5:30

Ashok Kharat Case Updates: स्वतःला देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात प्रकरणात एकमागून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Ashok Kharat Case: Even the pregnant woman and the students were not spared, Ashok Kharat's dark conspiracy exposed, investigation underway! | Ashok Kharat Case: गर्भवती महिला, विद्यार्थिनींसह तरुणांनाही सोडलं नाही, अशोक खरात काळे कारनामे, पोलीसही हादरले

Ashok Kharat Case: गर्भवती महिला, विद्यार्थिनींसह तरुणांनाही सोडलं नाही, अशोक खरात काळे कारनामे, पोलीसही हादरले

स्वतःला देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात प्रकरणात एकमागून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात या नराधमाने तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि पुरुषांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. अशोक खरात विरोधात आतापर्यंत सहा गंभीर गुन्हे दाखल करण्यात आली असून अजूनही पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे.

परीक्षेची भिती दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खरातने केवळ एका पद्धतीचा नव्हे, तर विविध मार्गांनी महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे समजत आहे.  एका २८ वर्षीय बी. एस.सीच्या विद्यार्थिनीला 'परीक्षेपूर्वी आशीर्वाद' देण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून, तिच्यावर २०२३ ते २०२५ दरम्यान वारंवार अत्याचार करण्यात आले. 

सुखरूप प्रसूतीच्या नावाखाली गर्भपती महिलेवर अत्याचार

सुखरूप प्रसूती आणि मुलगा होईल असे अमिष दाखवून एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला अंधारात नेऊन मंत्रोच्चाराच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार आणि गर्भपात

दरम्यान, एका पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला लग्नाचे वचन देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. यातून पीडिता गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात घडवून आणला. अशोक खरात खरा चेहरा समोर आल्यानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठून तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या कानावर घातला.

महिलांना बेशुद्ध करून अत्याचार

अनेक महिलांना भविष्य उज्वल होईल असे सांगून तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजले जात असे. हे पाणी प्यायल्यावर महिला अर्धवट बेशुद्धावस्थेत असताना किंवा गुंगीमध्ये असताना त्यांच्यावर बलात्कार केला जात असे.

लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची फसवणूक

पोलिसांनी खरातच्या 'ओक्स प्रॉपर्टी'वर छापा टाकला आणि तिथून १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, विद्यार्थिनी आणि महिलांचे शोषण केल्यानंतर, खरात त्यांना श्रीमंत पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. केवळ महिलाच नव्हे, तर लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांनाही या भोंदूने सोडले नाही. लग्नाचे योग येत नसल्याच्या समस्येवर उपाय म्हणून विशेष पूजा आणि विधी करण्याच्या नावाखाली त्याने अनेक पुरुषांकडून मोठी रक्कम उकळली आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असून अशा कोणत्याही भोंदू बाबा किंवा तांत्रिकाच्या भूलथापांना बळी पडू नका. कोणाकडूनही शोषण होत असल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title : अशोक खरात के काले कारनामे: महिलाओं का शोषण उजागर, जांच जारी।

Web Summary : खुद को भगवान बताने वाले अशोक खरात पर यौन शोषण और वित्तीय धोखाधड़ी के कई आरोप हैं। कथित तौर पर उसने गर्भवती महिला और छात्राओं सहित महिलाओं को अनुष्ठानों के नाम पर प्रताड़ित किया। पुलिस ने अश्लील वीडियो जब्त किए, जांच जारी है, पीड़ितों से आगे आने का आग्रह किया गया है।

Web Title : Ashok Kharat's dark deeds: Exploitation of women exposed, investigation ongoing.

Web Summary : Ashok Kharat, posing as a godman, faces multiple charges of sexual exploitation and financial fraud. He allegedly abused women under the guise of rituals, including a pregnant woman and students. Police seized explicit videos, and investigations continue, urging victims to come forward.