शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat: अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची झाली HIV चाचणी, आला असा रिपोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:52 IST

Ashok Kharat Case: अशोक खरात याने अनेक स्त्रियांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे उघडकीस आल्याने, त्याच्या माध्यमातून एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराचा संसर्ग पसरल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर अशोक खरात याची एचआयव्ही चाचणी करण्यात आली होती.

विधीचं कारण देत, अनिष्ठाची भीती दाखवून अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचं बिंग फुटल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. अशोक खरातचे अनेक महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडीओ आणि फोटो समाज माध्यमांमधून व्हायरल झाल्याने या प्रकरणातील गांभीर्य अधिकच वाढलं होतं. दरम्यान, अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अशोक खरात याची एचआयव्ही चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे. तसेच अशोक खरात याच्या एचआयव्ही चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या अशोक खरात याने त्याच्याकडे समस्या निवारणासाठी येणाऱ्या अनेक महिलांचं विविध कारणं देत, काहीतरी वाईट घडण्याची भीती दाखवून तसेच योनी शुद्धीसारखे विधी करण्याचा बहाणा बनवून लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले होते. एका पीडित महिलेने खरातविरोधात तक्रार दिल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला होता. तसेच पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेत तपास करून अशोक खरात याला बेड्या ठोकल्या होत्या.

दरम्यान, अशोक खरात याने अनेक स्त्रियांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे उघडकीस आल्याने, त्याच्या माध्यमातून एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराचा संसर्ग पसरल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर अशोक खरात याची एचआयव्ही चाचणी करण्यात आली होती. तसेच आता या चाचणीचा अहवाल आला आहे. तसेच हा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

याबरोबरच भोंदू अशोक खरातचे कोट्यवधीचे आर्थिक 'उद्योग' बघता आता त्याच्या मागे ईडी, विदेशी चलन (फॉरेक्स) आणि कस्टमचाही ससेमीरा लागण्याची चिन्हे आहेत. खरातच्या व्यवहाराची कागदपत्रे आता सक्त वसुली संचनालयाकडे (इडी) देण्यात येणार असल्याचे समजते. तसेच त्याच्या विदेश दौऱ्यांची व विदेशी चलन व्यवहारांची फॉरेक्सकडून चौकशी होणार आहे, तर दुसरीकडे त्याने तुर्कस्थानमधून आणलेल्या फर्निचरप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर विदेशातून आणलेल्या अन्य साहित्यावर कस्टम ड्युटी भरली किंवा नाही याचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी तो स्वतः मिळकतीचा मालक आहे, तर कुटुंबासह भागीदारीत जमिनी आहेत. दुर्मीळ भासणारे बनावट खडे, रत्न, पॉलिश केलेले चिंचोके, बनावटी मध विकून मिळवलेली माया आता चौकशीला पात्र ठरली आहे. हा आकडा प्रचंड मोठा असल्याने आयकर विभागापाठोपाठ पोलिसांकडून सक्त वसुली संचलनालयालादेखील कागदपत्रे देण्यात येणार आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Astrologer Ashok Kharat's HIV test results negative after exploitation allegations.

Web Summary : Ashok Kharat, accused of sexually exploiting women, tested negative for HIV. Facing accusations of abuse under the guise of rituals, Kharat is also under scrutiny for financial irregularities, potentially involving ED and Forex investigations related to foreign assets and income tax.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिकHIV-AIDSएड्स