Ashok Kharat: अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची झाली HIV चाचणी, आला असा रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:52 IST2026-03-27T13:52:00+5:302026-03-27T13:52:43+5:30
Ashok Kharat Case: अशोक खरात याने अनेक स्त्रियांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे उघडकीस आल्याने, त्याच्या माध्यमातून एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराचा संसर्ग पसरल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर अशोक खरात याची एचआयव्ही चाचणी करण्यात आली होती.

Ashok Kharat: अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची झाली HIV चाचणी, आला असा रिपोर्ट
विधीचं कारण देत, अनिष्ठाची भीती दाखवून अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचं बिंग फुटल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. अशोक खरातचे अनेक महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडीओ आणि फोटो समाज माध्यमांमधून व्हायरल झाल्याने या प्रकरणातील गांभीर्य अधिकच वाढलं होतं. दरम्यान, अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अशोक खरात याची एचआयव्ही चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे. तसेच अशोक खरात याच्या एचआयव्ही चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या अशोक खरात याने त्याच्याकडे समस्या निवारणासाठी येणाऱ्या अनेक महिलांचं विविध कारणं देत, काहीतरी वाईट घडण्याची भीती दाखवून तसेच योनी शुद्धीसारखे विधी करण्याचा बहाणा बनवून लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले होते. एका पीडित महिलेने खरातविरोधात तक्रार दिल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला होता. तसेच पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेत तपास करून अशोक खरात याला बेड्या ठोकल्या होत्या.
दरम्यान, अशोक खरात याने अनेक स्त्रियांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे उघडकीस आल्याने, त्याच्या माध्यमातून एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराचा संसर्ग पसरल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर अशोक खरात याची एचआयव्ही चाचणी करण्यात आली होती. तसेच आता या चाचणीचा अहवाल आला आहे. तसेच हा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
याबरोबरच भोंदू अशोक खरातचे कोट्यवधीचे आर्थिक 'उद्योग' बघता आता त्याच्या मागे ईडी, विदेशी चलन (फॉरेक्स) आणि कस्टमचाही ससेमीरा लागण्याची चिन्हे आहेत. खरातच्या व्यवहाराची कागदपत्रे आता सक्त वसुली संचनालयाकडे (इडी) देण्यात येणार असल्याचे समजते. तसेच त्याच्या विदेश दौऱ्यांची व विदेशी चलन व्यवहारांची फॉरेक्सकडून चौकशी होणार आहे, तर दुसरीकडे त्याने तुर्कस्थानमधून आणलेल्या फर्निचरप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर विदेशातून आणलेल्या अन्य साहित्यावर कस्टम ड्युटी भरली किंवा नाही याचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
काही ठिकाणी तो स्वतः मिळकतीचा मालक आहे, तर कुटुंबासह भागीदारीत जमिनी आहेत. दुर्मीळ भासणारे बनावट खडे, रत्न, पॉलिश केलेले चिंचोके, बनावटी मध विकून मिळवलेली माया आता चौकशीला पात्र ठरली आहे. हा आकडा प्रचंड मोठा असल्याने आयकर विभागापाठोपाठ पोलिसांकडून सक्त वसुली संचलनालयालादेखील कागदपत्रे देण्यात येणार आहेत.