Ashok Kharat Case: खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना दणका, तिघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:48 IST2026-03-26T14:47:30+5:302026-03-26T14:48:05+5:30

Ashok Kharat Case: अशोक खरातने शोषण केलेल्या अनेक पीडित महिलांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करणाऱ्यांना दणका देणारं पाऊल पोलिसांनी उचललं आहे. अशा प्रकारे पीडित महिलांचे व्हिडीओ शेअर केल्या प्रकरणी पोलिसांनी आज राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. 

Ashok Kharat Case: A blow to those who made the videos of the victims of the Kharat case viral, a case has been registered against three | Ashok Kharat Case: खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना दणका, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Ashok Kharat Case: खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना दणका, तिघांविरोधात गुन्हा दाखल

सध्या राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणातील अनेक पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. असे न करण्याबाबत वारंवार आवाहन केल्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत. दरम्यान, अशोक खरातने शोषण केलेल्या अनेक पीडित महिलांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करणाऱ्यांना दणका देणारं पाऊल पोलिसांनी उचललं आहे. अशा प्रकारे पीडित महिलांचे व्हिडीओ शेअर केल्या प्रकरणी पोलिसांनी आज राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडीओ शेअर केल्या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडीओ काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्या प्रकरणी अहिल्यानगरमधील कोपरगाव येथील राहुल शिंदे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याला व्हिडीओ देणाऱ्या योगेश आढाव याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय बीडमधील माजलगाव येथील योगेश गर्जे याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

Web Title : खरात मामले में पीड़ितों के वीडियो वायरल करने वालों पर कार्रवाई; एफआईआर दर्ज।

Web Summary : अशोक खरात यौन शोषण पीड़ितों के वीडियो प्रसारित करने के आरोप में पुलिस ने तीन लोगों के खिलाफ एफआईआर दर्ज की। बार-बार अपील के बाद भी ऐसी सामग्री साझा करने से रोकने के लिए यह कार्रवाई की गई है। कोपरगाँव और माजलगाँव में मामले दर्ज।

Web Title : Action against those who circulated Kharat case victim videos; FIR filed.

Web Summary : Police filed FIRs against three individuals for circulating videos of Ashok Kharat sexual abuse victims. This action follows repeated appeals to stop sharing such content, with cases registered in Kopargaon and Majalgaon.