शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

पराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही- अशोक चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 06:47 IST

गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोट येथे केले

अकोट (अकोला) : गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोट येथे केले. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान स्थानिक खरेदी-विक्री मैदानात सभा पार पडली. त्यावेळी चव्हाण बोलत होते.अशोक चव्हाण म्हणाले, की केंद्रात व राज्यात भाजप-सेनेचे सरकार आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. जनतेची फसवणूक केली. या सरकारला शेतकरी, युवक, व्यापारी सर्वच कंटाळले आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापन करणार, सहा महिन्यांनंतर आपलेच सरकार येईल.भाजपा सरकारने शेतकऱ्यांना मदत तर केली नाहीच; परंतु जीएसटीचा कायदाही शेतकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरला आहे. व्यापाºयांना वर्षात ३६ रिटर्न भरावे लागत आहेत. राज्यात हे सरकार आल्यापासून ११ हजारांच्यावर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, तर देशात ५० हजारांच्यावर हा आकडा गेला आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.नागपूरकर मुख्यमंत्र्यांचे पश्चिम विदर्भाकडे दुर्लक्षएकेकाळी अकोला जिल्ह्याची ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळख होती. मात्र, सध्या या जिल्ह्यातील सुतगिरण्या बंद पडल्या असून, नवीन उद्योग सुरू करण्यात आले नाहीत. पश्चिम विदर्भाकडे नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळापूर येथे केला. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेंतर्गत आयोजित सभेत बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, केंद्र सरकारला राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उत्तर देता येत नसल्याने त्यांनी तत्काळ सीबीआय संचालकांना हटविण्याची घाई केली. यातच भ्रष्टाचार दडला असून, ‘न खाउंगा, ना खाने दुंगा’ची भाषा आता बदलत आहे. २०१४ मध्ये दिलेले अच्छे दिन, नोटबंदी, जीएसटी, शेतकºयांच्या मालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासनांपैकी कुठलेही आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही असे ते म्हणाले.सरकारी संस्थांमध्ये वाढता हस्तक्षेपईडी, सीबीआय यासारख्या सरकारी संस्थांमध्ये सरकारचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे. या संस्थांचा वापर करून सरकार विरोधी पक्षांना वेठीस धरीत आहे. हा एकप्रकारचा ‘कर्करोग’च आहे. हा कर्करोग तुमच्या आमच्यासह सर्वांना गिळंकृत करेल, असेही अशोक चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९